लेख-समिक्षण

धूम्रपान आणिं मनारोग्य

माणसाने अनेक विचित्र सवयी स्वतःला लावून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये नाका-तोंडातून धूर काढणार्‍या धूम्रपानाचा समावेश होतो. ‘नाकाचा वापर धुराड्यासारखा व्हावा अशी देवाची इच्छा असती तर त्याने नाकपुड्या उफराट्या ठेवल्या नसत्या का?’ असे महान कृषीशास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी म्हटले होते.
‘धूम्रपान आरोग्यासाठी घातक असते’, असे वाक्य सिगारेटच्या पाकिटावरही लिहिलेले असते; पण तरीही अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात आणि सर्रास धूम्रपान करतात. धूम्रपानाचा परिणाम केवळ आपल्या शारीरिक आरोग्यावरच नाही, तर तो मानसिक आरोग्यावरही होत असतो. जर धूम्रपान करणार्याने धूम्रपानास तिलांजली दिली तर त्याचे मानसिक आरोग्य सुधारते, असे मत वॉशिंग्टन विद्यापीठातील एका संशोधकाने व्यक्त केलेले आहे.
हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या रुग्णाने जर धूम्रपान सोडले, तर त्याचे फायदे त्याला लगेच मिळतात. त्याचे दैनंदिन जीवन सुधारते आणि त्याच्या मानसिक आरोग्यातही बर्यापैकी सुधारणा होतात.
धूम्रपान सोडल्यास महिनाभरात त्याचे मानसिक परिणाम तुम्हाला जाणवायला लागतात, असे वॉशिंग्टन विद्यापीठातील औषधोत्पादन विभागचे सहायक प्राध्यापक शेरॉन क्रेसी यांनी सांगितले. धूम्रपान सातत्याने करणार्याला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. हृदयविकाराचा पहिला झटका येऊनही जो धूम्रपान सोडत नसेल तर त्याला दुसरा झटका येण्याची किंवा मृत्यू येण्याची भीती असते. पण, हृदयविकाराचा पहिला झटका आल्यानंतर धूम्रपान कायमचे सोडून दिले तर दुसरा झटका येण्याची शक्यता काही प्रमाणात कमी होते. रुग्णाच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. दैनंदिन जीवनात त्याला प्रसन्न वाटते आणि विचारशीलतेलाही चालना मिळते, असे क्रेसी सांगतात.

Check Also

जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी

तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप …