लेख-समिक्षण

अरशद, अक्षयची वकिली वादात

न्यायालयीन व्यवस्थेवर तिरकस भाष्य करणार्‍या ‘जॉनी एलएलबी’ चित्रपटाने रसिकांची पसंती मिळवली. अक्षयच्या पहिल्या भागानंतर अरशदच्या दुसर्‍या भागानेही तेवढेच मनोरंजन केले. त्यामुळेच निर्मात्यांनी त्याचा तिसरा भाग आणायचा ठरवला. यात दोन्ही जॉली म्हणजे अक्षय आणि अरशद दिसणार आहे. टिझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील एका दृश्याने वादंग निर्माण झाला आहे.
काही दिवसांपूर्वी ‘जॉली एलएलबी’च्या तिसर्‍या भागाची माहिती सांगणारा टिझर प्रदर्शित झाला. दोन जॉलीची जुगलबंदी पहायला मिळणार या आनंदात चाहते असतानाच मिठाचा खडा पडला.
पुण्यातील वकिल वाझेद खान बिडकर आणि गणेश मस्के यांनी न्यायालायत अर्ज दाखल केला. त्यानुसार, या चित्रपटात न्यायव्यवस्थेची थट्ट करुन न्यायाधिशांना मामू संबोधले. यावर बिडकर आणि मस्के यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. बिडकर आणि मस्के यांच्या अर्जानुसार, पुण्यातल्या न्यायालयाने दोघांना समन्स बजावले. – सुचित्रा दिवाकर

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …