सध्याच्या स्पर्धेच्या युगात अशा प्रकारचे एखादे वैशिष्ट्य आपल्याकडे असणे आवश्यक असते. आपल्या क्षेत्रातील पदवीबरोबरच तुम्हाला मातृभाषेव्यतिरित अन्य एखादी भाषाही अवगत आहे असे दिसले तर तुम्हाला नोकरी मिळण्यात प्राधान्य दिले जाते. पूर्वी म्हणजे साधारण ४०-५० वर्षापूर्वी एकापेक्षा अधिक भाषा जाणून घेणे हे लहान मुलांच्या दृष्टीने नुकसानकारक ठरू शकते असे बोलले जात असे. लहान वयात मुलांना एकापेक्षा अधिक भाषा शिकायला लावल्या तर त्यांच्या मेंदूच्या वाढीत अडथळा येतो तसेच त्यांना बोलण्यातही काही अडचणी येतात असे दिसले होते. मात्र आता एकापेक्षा अधिक भाषा जाणून घेण्याचा ट्रेंड वाढू लागला आहे.
इंजिनिअरींगच्या पदवीबरोबरच तुमच्याकडे जपानी, जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच अशा भाषांची पदवी असेल तर नोकरी मिळणे सोपे जाते. अनेक कंपन्या वेगवेगळ्या भाषांचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य देतात असे दिसले आहे. म्हणूनच स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी एकापेक्षा अधिक भाषा यायला हव्यात.
मातृभाषेव्यतिरित अन्य भाषा शिकत असताना ती भाषा बोलल्या जात असलेल्या प्रदेशातील संस्कृतीही अभ्यासत असतो. ती भाषा बोलल्या जाणार्या देशातील लोकांच्या चालीरिती, रहाणीमान, प्रथापरंपरा याविषयी बारीक सारीक माहिती होत जाते. त्यातून अनेक फायदे मिळतात. विशेषत: परदेशात पर्यटनाला गेल्यावर तेथील भाषा बोलता येणे, तेथील नागरिकांशी स्थानिक भाषेत संवाद साधता येणे फायदेशीर ठरणारे असते.
अनेक विदशी पर्यटक कंपन्यांना असे दुभाषी हवे असतात. त्यामुळे इतर भाषा शिकल्यास या क्षेत्रात करिअर करण्यास मोठा वाव आहे. एकापेक्षा अधिक भाषा बोलू लागल्यावर आपली स्मरणशतीही वाढते अस दिसले आहे. याखेरीज अधिक भाषा बोलता येणार्या व्यती मल्टीटास्किंगचे काम इतरांपेक्षा अधिक कार्यक्षमतेने करू शकतात असेही वैद्यकीय संशोधनात दिसून आले आहे.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात जवळपास प्रत्येक उमेदवार शैक्षणिक गुणवत्तेचा विचार केला तर समान असतो. अशा वेळी या स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याकडे अन्य उमेदवारांकडे नसलेले कौशल्य असले पाहिजे. असे कौशल्य एकापेक्षा अधिक भाषा शिकल्याने मिळू शकते. नोकरी मिळवताना दोन-तीन विदेशी भाषाही येतात हा तुमचा प्लस पॉईंट ठरू शकतो. विदेशी मोटार उत्पादक कंपन्या, सॉफ्टवेअर कंपन्या तसेच बिपीओ यामध्येही एकापेक्षा अधिक भाषा समजणार्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. सध्या जापनीज, जर्मन, फ्रेंच, स्पॅनीश या भाषांना विद्यार्थ्यांकडून मोठी मागणी आहे. या भाषांसाठीचे अभ्यासक्रम अनेक ठिकाणी चालवले जातात. खासगी संस्थाही अशा प्रकारच्या भाषा शिकवण्याचे वर्ग चालवतात. त्यांच्या मदतीने तुम्हालाही नकीच बहुभाषिक बनता येईल. त्यासंदर्भात अनेक वैद्यकीय संशोधने झाली आहेत. त्यात असे दिसून आले आहे की बहुभाषीक असणार्या लोकांची स्मरणशती इतर लोकांपेक्षा खुपच अधिक असते.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र