लेख-समिक्षण

सायकल चोरीला गेली नसती तर….

१९५४ मध्ये जेव्हा कॅसियस फक्त बारा वर्षांचा होता, तेव्हा तो आपल्या मित्रांसोबत लुईव्हिल येथील कोलंबिया सभागृहात ‘होम शो’ पाहायला गेला होता. प्रदर्शनात फर्निचर आणि घरगुती उपकरणांबरोबरच मुलांना मोफत पॉपकॉर्नसारख्या लहानसहान आनंददायी गोष्टी देखील मिळाल्या. पण जेव्हा कॅसियस बाहेर आला तेव्हा त्याची लाडकी लाल-पांढरी सायकल चोरीस गेली होती.
हताश आणि रागावलेला कॅसियस तक्रार करण्यासाठी एका पोलिसाकडे गेला. त्याने रागाने त्या पोलिसाला सांगितले की ज्याने त्याची सायकल चोरली आहे त्याला तो चांगलंच मारणार आहे. त्या पोलिसाचं नाव होतं जो मार्टिन. योगायोगाने तो पोलिस कोलंबिया सभागृहाच्या तळमजल्यावर असलेल्या जिममध्ये बॉसिंगचे वर्ग चालवत असे. त्याने कॅसियसला वर्गात सामील होण्याचे आमंत्रण दिले, जेणेकरून कॅसियस आपला राग आटोयात ठेवून त्याला एका सकारात्मक मार्गावर वळवू शकेल.
कॅसियसला लवकरच जाणवलं की, त्याला बॉसिंग खूप आवडत असून त्यामध्ये मजा देखील येते आहे. जो मार्टिनकडून प्रशिक्षण सुरू केल्यानंतर काही काळातच त्याला स्थानिक दूरदर्शन कार्यक्रम ‘टुमॉरो’ज चॅम्पियन्स’ मध्ये संधी मिळाली.
लवकरच हा मुलगा स्वतःपेक्षा मोठ्या वयाच्या रॉनी ओ’कीफी विरुद्ध रिंगमध्ये उतरला. त्याने हा सामना जिंकला आणि अशा प्रकारे एका महान बॉसरच्या अद्वितीय जीवनाची सुरुवात झाली. चोरीला गेलेली सायकल त्याला कधीच परत मिळाली नाही, पण त्या घटनेनंतर त्याने आपली सारी ऊर्जा बॉसिंगकडे वळवली. इतकंच नाही, तर कधी-कधी मार्टिनला पहाटे चार वाजताच जिम उघडावी लागे, कारण कॅसियस शाळेत जाण्यापूर्वी सराव करायचा हट्ट धरत असे. असा हा कॅसियस पुढे संपूर्ण जगभरात मोहम्मद अली या नावाने प्रसिद्ध झाला.
मोहम्मद अलीला तर सगळेजण ओळखतातच, पण त्या रात्री कॅसियसच्या रागाला योग्य दिशा त्या पोलिसाने दिली नसती, तर कदाचित जगाला मोहम्मद अलीच्या कौशल्याचा परिचय झाला असता का?

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …