आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा विनोदी अभिनेता कपिल शर्मा बहुप्रतीक्षित सिक्वेल ‘किस किसको प्यार करू २’साठी तयार आह़े ‘किस किसको प्यार करू’ या सुपरहिट कॉमेडी चित्रपटाच्या सिक्वलचे शूटिंग अनुकल्प गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली मुंबईत सुरू झाले आहे. या चित्रपटात कपिल शर्मा मुख्य भूमिकेत असून, हा चित्रपट विनोद आणि गोंधळाचा डबल डोस देणार आहे. या चित्रपटाचे निर्माते रतन जैन, गणेश जैन आणि अब्बास-मस्तान असून, हा चित्रपट व्हिनस वर्ल्डवाइड एंटरटेनमेंटच्या अंतर्गत तयार होत आह़े ‘किस किसको प्यार करू २’ मध्ये कपिल शर्मासोबत अभिनेता मनजोत सिंग तसेच कपिल आणि अब्बास-मस्तान यांची जोडी पुन्हा एकत्र येत आहे. याआधी २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अब्बास-मस्तान यांनी केले होते. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करू’ या चित्रपटाद्वारे कपिल शर्माने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्या चित्रपटात कपिलसोबत साई लोकुर, जेमी लीवर, अरबाज खान, मंजरी फडणीस, सिमरन कौर मुंडी, एली अवराम, वरुण शर्मा, सुप्रिया पाठक, शरत सक्सेना आणि मनोज जोशी यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. चित्रपटाची कथा अशी होती की, कुमार शिव राम किशन नावाचे एक पात्र, त्याच्या तीन पत्नी, एक गर्लफ्रेंड आणि त्याच्याशी संबंधित गोंधळाभोवती चित्रपटाची कथा फिरत़े कपिलच्या या चित्रपटातील कॉमेडीला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली होत़ी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. आता ‘किस किसको प्यार करू २’ देखील तितकाच यशस्वी होईल, अशी आशा प्रेक्षकांना असेल़ – जगदीश काळे
Check Also
गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी
बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र …
पांचजन्य वृत्तपत्र