लेख-समिक्षण

खर्‍या व्यक्तिमत्त्वाचा शोध

आजचा तरुण झपाट्याने बदलणार्‍या जगाशी स्पर्धा करत आहे. सोशल मीडियावर चमक, करिअरची धावपळ, सतत तुलना… अशा गोंधळात एक गोष्ट हरवतेय ती म्हणजे खरं व्यक्तिमत्त्व.
खर्‍या यशाची सुरुवात बाहेरच्या जगावर नाही, तर स्वतःवर विजय मिळवण्यात असते. काहींना वाटतं की चांगलं व्यक्तिमत्त्व म्हणजे स्टायलिश दिसणं, इंग्रजीत फटाफट बोलणं किंवा लोकांच्या समोर आत्मविश्वासानं वावरणं.
खरं पाहिलं, तर व्यक्तिमत्त्व म्हणजे र्तनातली प्रामाणिकता, मनातली शिस्त, आणि कृतीमागचं जाणिवपूर्ण उद्दिष्ट. विचारांचा दर्जा जितका उच्च, व्यक्तिमत्त्व तितकं प्रभावी.
आपल्याला जग बदलायचं वाटतं, पण सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. रोज स्वतःला एक साधा प्रश्न विचार: मी आज काही नवीन शिकलो का? मी कालपेक्षा अधिक संयमी, अधिक सकारात्मक झालो का? स्वतःवर काम करणं हीच यशाची खरी तयारी असते.
कोणीही ’बॉर्न कॉन्फिडंट’ नसतो. आत्मविश्वास म्हणजे स्वतःला ओळखून त्यावर विश्वास ठेवणं. त्यासाठी गरज असते ‡ चुकल्यावरही जबाबदारी घेण्याची, आणि टिकून राहण्याची. आत्मविश्वास म्हणजे प्रत्येक वेळी यशस्वी होणं नव्हे, तर प्रत्येक अपयशानंतरही पुन्हा उभं राहणं.
इतरांसोबतचं तुमचं वागणं हाच तुझ्या व्यक्तिमत्त्वाचा खरा आरसा असतो. नम्रता, सहानुभूती, वेळेचं भान, आणि मन मोकळं ठेवणं ‡ हे गुण तुमचं व्यक्तिमत्त्व अधोरेखित करतात. लक्षात ठेवा, संवाद करताना शब्द विसरले जातात, पण आपला दृष्टिकोन कायम लक्षात राहतो.
व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी
दररोज आत्मविकास, चरित्र, मनोविज्ञान यांबाबतचं किमान १५ मिनिटं वाचन करा.
मनाशी प्रामाणिक संवाद साधून दिवसाचा आढावा घ्या.
सकारात्मक बोलणं आणि ऐकण्याबरोबरच‡ तक्रारी कमी, उपाय अधिक हे सूत्र ठेवा.
स्वतःसाठी वेळ राखून ठेवा. नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा.चुका स्वीकारून शिकणं ही ताकद आहे
शेवटी व्यक्तिमत्त्व म्हणज न थकता चालत राहणं, न डगमगता उभं राहणं आणि न थांबता स्वतःला घडवत राहणं.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …