लेख-समिक्षण

रेफ्रिजरेट वापराचे तंत्र

रेफ्रिजरेट किंवा फ्रिजचा योग्य वापर केल्याने तो दीर्घकाळ टिकतो आणि अन्नाचा ताजेपणा कायम राहतो. काही तांत्रिक गोष्टींचे पालन केल्यास फ्रिज अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो.
१. फ्रिजचे योग्य तापमान सेटिंग:
फ्रिजचा मुख्य भाग: १ ते ४ अंश सेल्सियस दरम्यान तापमान ठेवा.
फ्रीजर विभाग: -१८ अंश किंवा त्याहून कमी तापमानावर ठेवा.
विविध खाद्यपदार्थांसाठी: दुग्धजन्य पदार्थ, भाज्या, आणि उरलेले अन्न योग्य तापमानात ठेवा.
२. फ्रिजमध्ये अन्न ठेवण्याची योग्य पद्धत:
गरम अन्न ठेवल्यास फ्रिजला अधिक मेहनत घ्यावी लागते आणि इतर पदार्थांचे तापमानही वाढते. हे लक्षात घेता गरम पदार्थ थंड झाल्यावरच फ्रीजमध्ये ठेवावेत. अन्न साठवताना अंतर ठेवा. कारण हवेशीर मोकळी जागा ठेवल्याने थंड हवा योग्यरित्या फिरते.
३, योग्य विभागात पदार्थ ठेवा:
वरच्या रॅकमध्ये दुधाचे पदार्थ, मधल्या रॅकमध्ये शिजवलेले अन्न आणि दैनंदिन उपयोगातील पदार्थ, तळातील ट्रेे भाज्या आणि फळे अशी सुटसुटीत रचना करुन फ्रीजमध्ये अन्नपदार्थ ठेवावेत. दरवाज्याच्या कप्प्यात सॉस, लोणचं आणि पाणी यांसारख्या वस्तू ठेवाव्यात. कारण दरवाजा वारंवार उघडल्याने तापमान बदलते.
फ्रीजरमध्ये प्लास्टिक किंवा ग्लास कंटेनर वापरावेत. कारण मेटल कंटेनरपेक्षा हे अधिक प्रभावी असतात. जास्त काळ ठेवायच्या वस्तू हवाबंद डब्यात ठेवाव्यात. यामुळे फ्रीजर बर्न टाळता येते.
४. फ्रिज स्वच्छ करण्याची योग्य पद्धत:
दर १५ दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा फ्रिज स्वच्छ करा. स्वच्छ करण्यासाठी: कोमट पाण्यात लिंबाचा रस किंवा सौम्य साबण मिसळून कपड्याने पुसा.
फ्रिज मॅन्युअल डीफ्रॉस्ट प्रकारचा असेल तर फ्रीजरमधील अनावश्यक बर्फ काढण्यासाठी साधारणतः दर १० दिवसांनी डीफ्रॉस मोड वापरा. दरवाज्याच्या गॅस्केट (सील) स्वच्छ ठेवा. त्या खराब झाल्या असल्यास थंड हवा बाहेर जाऊ शकते. परिणामी, वीज जास्त खर्च होते. फ्रिज वारंवार उघडू नका, त्यामुळे आतले तापमान वाढते आणि थंड करण्यासाठी जास्त ऊर्जा लागते. जुना फ्रिज असेल तर ऊर्जा बचत करणारा स्टार रेटिंग पाहून नवीन फ्रिज घ्या.

Check Also

लहान मुले आणि व्हिडिओ कॉलिंग

लहान मुलांच्या निरागस हालचाली सर्वांनाच मोहवून टाकतात. अनेकदा दूर राहणारे नातेवाईक किंवा मित्रमंडळी बाळाला पाहण्यासाठी …