हसवाफसवीपटाच्या क्रमवारीत वरच्या श्रेणीवर असलेला ‘हेरा फेरी’चा तिसरा भाग येण्याची शक्यता आहे. अद्याप या चित्रपटाबद्दल अधिकृत माहिती बाहेर आली नसली तरी इतर कलाकारांच्या माध्यमातून ती येत आहे. ‘माझ्याशिवाय हेराफेरी पूर्ण कसा होईल’, असे सांगत तब्बूने आपली हजेरी चित्रपटात निश्चित केल्याचे दिसते.
दुसरीकडे पहिल्या भागातला कबीरा म्हणजेच गुलशन ग्रोव्हर पुन्हा तिसक्तया भागात दिसणार आहे. पहिल्या भागातल्या सर्व कलाकारांना परत आणण्याचा दिग्दर्शक प्रियदर्शनचा प्रयत्न असणार आहे. गुलशन ग्रोव्हर आणि निर्माते फिरोझ नादियादवाला यांच्यात बक्तयाच बैठका झाल्या आहेत. पहिल्या भागात बाबूरावला ‘कबीरा स्पीकिंग…’ असा फोन येतो. त्यानंतर गोंधळाची मालिका सुरू होते. गुलशन ग्रोव्हर नुकताच ‘इंडियन’च्या दुसक्तया भागात दिसला होता. त्यानंतर ‘लव्ह इन व्हिएतनाम’ आणि नागराज मंजुळेच्या ‘मटका किंग’मध्ये तो दिसणार आहे.- प्रियांका जाधव
Check Also
गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी
बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र …
पांचजन्य वृत्तपत्र