लेख-समिक्षण

बारावीनंतरचे मिशन पार पाडताना…

बारावी झाली… आता पुढे काय? हे वाय आज हजारो विद्यार्थ्यांच्या मनात घोळतंय. परीक्षा संपली, निकाल लागला आणि आता करिअरची दिशा ठरवायची वेळ आली आहे. पण खरं सांगायचं, तर ही वेळ जितकी उत्साही वाटते, तितकीच गोंधळात टाकणारीही असते. दरवर्षी लाखो विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करतात, सीईटीसारख्या परीक्षांची तयारी करतात, आणि स्वप्नांच्या दिशा शोधू लागतात.
महाराष्ट्रातले उदाहरण सांगायचं झालं, तर एमएचटी- सीईटी ही एक महत्वाची परीक्षा आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी अशा कोर्सेससाठी ही परीक्षा दिली जाते. वैद्यकीय क्षेत्रात जायचंय? मग नीटची तयारी करा. कायद्यात रस आहे? मग क्लॅट परीक्षांची तयारी करा. आर्किटेचर, डिझाईन, मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट… प्रत्येक क्षेत्रासाठी वेगळी प्रवेश परीक्षा आणि त्यामागे एक स्वतंत्र जग.
ही तयारी म्हणजे केवळ पुस्तकांमध्ये डोकं खुपसणं नाही, तर एक नियोजनबद्ध लढाई आहे. कोणती परीक्षा कधी आहे, फॉर्म कधी भरायचा, कोणती कागदपत्रं लागतात, आणि सर्वात महत्त्वाचं‡स्वतःच्या आवडीचा आणि क्षमतेचा अभ्यास करून निर्णय घ्यायचा. यासाठी सोशल मीडियाच्या बातम्या, मित्रांचे अनुभव किंवा सगळे इंजिनिअरिंग करतायत, मीही करतो अशा निर्णयांपासून थोडं दूर राहायला हवं.
आजची शिक्षणपद्धती ऑनलाइन झाली आहे. फॉर्म भरणं, प्रवेश परीक्षा, अगदी काउन्सलिंगसुद्धा‡सगळं डिजिटल. त्यामुळे संगणक आणि मोबाईलचा योग्य वापर शिकणं गरजेचं झालं आहे. चुकीची माहिती, चुकीचा अर्ज, किंवा एक टप्पा चुकवला, की वर्ष वाया जाण्याची शयता असते. म्हणून एक छोटा डायरी किंवा नोट्स ठेवा‡कोणती परीक्षा कधी?, फॉर्मची शेवटची तारीख काय?, माझा अभ्यास किती टक्के झाला? हे सगळं लिहून ठेवा.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा प्रवास एकटा नाही. आई-वडील, शिक्षक, काउंसलर्स, आणि मित्र… या सगळ्यांची मदत घ्या. मार्गदर्शन मागायला अजिबात संकोच करू नका. आपल्या मनात अनेक प्रश्न असतात‡माझं मार्क कमी आहे, तरी मी सीईटी देऊ का?, माझं इंग्रजी कमजोर आहे, मी लॉ करू शकतो का?‡या सगळ्यांची उत्तरं योग्य व्यक्तीकडून मिळतात. योग्य माहिती म्हणजेच अर्धं युद्ध जिंकलं.
शेवटी, शिक्षण ही केवळ स्पर्धा नाही, ती आत्मविकासाची वाट आहे. सीईटी, नीट, जेईई, क्लॅट या सगळ्या परीक्षांमधून आपल्याला एक दार मिळतं‡पुढच्या संधीचं, पुढच्या टप्प्याचं. कोणीतरी डॉटर होईल, कोणीतरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकेल, आणि कोणीतरी ग्रामीण भागात शेतीत बदल घडवेल.
म्हणून, आता वेळ आहे सज्ज होण्याची. अभ्यासाची आणि आत्मपरीक्षणाची. आपण काय बनू शकतो? यापेक्षा, आपण काय व्हायला हवं? हा प्रश्न विचारायची. आणि मग, योग्य तयारी, योग्य परीक्षा आणि योग्य वेळेचं भान ठेऊन पुढे वाटचाल करायची.

Check Also

लहान मुले आणि व्हिडिओ कॉलिंग

लहान मुलांच्या निरागस हालचाली सर्वांनाच मोहवून टाकतात. अनेकदा दूर राहणारे नातेवाईक किंवा मित्रमंडळी बाळाला पाहण्यासाठी …