मासिक पाळी सुरू झाल्यानंतर हार्मोनल बदलांमुळे शरीरात अनेक बदल दिसू लागतात. हात, पाय आणि शरीराच्या इतर भागांवर केस वाढणे हा या बदलांचा एक भाग आहे. ही बाब अगदी सामान्य असल्याने त्याबाबत फारशी काळजी करण्याचे कारण नाही. पण सौंदर्याखातर जर मुलींना अशा केसांपासून सुटका हवी असेल तर लेझर उपचार सर्वात प्रभावी आहे. परंतु, हे उपचार वयाच्या १८ वर्षापूर्वी घेऊ नयेत. यावर घरगुती उपचार करावेत. यासाठी बेसन आणि मोहरीच्या तेलाच्या मिश्रणाची पेस्ट तयार करून त्वचेवर लावा आणि नंतर हलया हाताने मसाज करा. असे नियमित केल्याने नको असलेले केस निघून जातात. पण, या प्रक्रियेमुळे खूप मऊ केसच निघून जातात. घट्ट असणारे केस काढायचे असतील तर वॅसिंगचा पर्याय निवडता येईल. पण तो वयाच्या १४ व्या वर्षानंतरच वापरावा.
Check Also
लहान मुले आणि व्हिडिओ कॉलिंग
लहान मुलांच्या निरागस हालचाली सर्वांनाच मोहवून टाकतात. अनेकदा दूर राहणारे नातेवाईक किंवा मित्रमंडळी बाळाला पाहण्यासाठी …
पांचजन्य वृत्तपत्र