गुगलने जीमेल वापरणार्यांसाठी ‘मॅनेज सबस्क्रिप्शन’ नावाचे एक अतिशय उपयुक्त फिचर सुरू केलं आहे. या फिचरच्या माध्यमातून वापरकर्तेआता एका क्लिकमध्ये कोणत्याही इमेल सबस्क्रिप्शनमधून सहजपणे बाहेर पडू शकतात. एवढंच नव्हे, तर एखाद्या ईमेल आयडीकडून आतापर्यंत तुम्हाला किती इमेल आले आहेत, याचीही माहिती यामध्ये मिळेल.सध्या हे फिचर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिले जात आहे. लवकरच हे फिचर आयओएष आणि वेब वापरकर्त्यांसाठीही लागू करण्यात येणार आहे.
जीमेल अॅपमध्ये डाव्या वरच्या कोपर्यात असलेल्या मेन्यू चिन्हावर क्लिक केल्यावर, खाली स्क्रोल केल्यास ट्रॅशच्या खाली तुम्हाला मॅनेज युवर सबस्क्रिप्शन हा नवा पर्याय दिसेल.
यावर क्लिक करताच तुमचं जीमेल खाते सध्या कोणकोणत्या इमेल सबस्क्रिप्शनशी जोडलेलं आहे, त्याची यादी दिसेल. प्रत्येक पाठवणार्याच्या नावाखाली ‘अनसबस्क्राइब’ करण्याचा पर्याय दिला जाईल.
या नव्या फिचरमुळे काय करता येईल?
एका क्लिकमध्ये नको असलेल्या इमेल सबस्क्रिप्शनमधून बाहेर पडता येईल.
प्रत्येक सेंडरकडून आतापर्यंत किती इमेल आले आहेत, याची आकडेवारी पाहता येईल
तुमचं इनबॉक्स अधिक स्वच्छ, लक्ष केंद्रीत आणि व्यवस्थित राहील
अनावश्यक प्रमोशनल किंवा स्पॅम इमेल्सपासून सुटका मिळेल
हळूहळू हे फिचर सगळ्याच अँड्रॉइड युजर्सना दिसू लागेल. तुम्हाला अद्याप हे पर्याय दिसत नसला तरी गुगल लवकरच तो सर्वांसाठी सुरू करणार आहे.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र