लेख-समिक्षण

‘हेराफेरी 3’ला पुढील वर्षी सुरुवात

हेरा फेरी-3’ या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? दरम्यान, आता दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी एक मोठी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ‘हेरा फेरी-3’ च्या पटकथेवर 2026 मध्ये काम केले जाईल. हे एका आव्हानापेक्षा कमी नसेल असेही त्यांनी सांगितले.
प्रियदर्शन म्हणाले, ‘मी पुढच्या वर्षी ‘हेरा फेरी-3’ वर काम सुरू करेन. या चित्रपटाचा तिसरा भाग बनवणे खूप कठीण जाईल, कारण लोकांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.ते म्हणाले की, प्रेक्षकांना रडवणे किंवा घाबरवणे सोपे आहे, पण लोकांना हसवणे तितकेच किंवा त्याहूनही कठीण आहे. याशिवाय, त्यांनी असेही सांगितले की काळानुसार हसण्याची पद्धत बदलते आणि लोकांच्या आवडीनिवडीही बदलत राहतात. म्हणून आपण त्यानुसार ज्ाुवून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे चित्रपटातील पात्रांची संख्याही वाढली आहे, त्यामुळे सर्वात मोठे काम म्हणजे त्यांची कथा अशा प्रकारे दाखवणे की ती खरी वाटेल.’
प्रियदर्शन म्हणाले की, ‘हेरा फेरी-3’ मधील काही घटना अतिशयोक्तीपूर्ण असतील पण त्या पाहिल्यानंतर प्रेक्षकांना असे वाटेल की हेदेखील घडू शकते. सध्या, जेव्हा मी पटकथेवर काम करेन, तेव्हाच काय करायचे ते स्पष्ट होईल. तथापि, त्यावर काम करणे हे एक मोठे आव्हान आहे.
अक्षय कुमारसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल बोलताना प्रियदर्शन म्हणाला की, मोहनलालनंतर अक्षय कुमार हा असा अभिनेता आहे ज्याच्यासोबत त्याने सर्वात जास्त काम केले आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी त्यांच्या वाढदिवशी ‘हेरा फेरी-3’ या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यांच्या एका पोस्टमध्ये त्यांनी परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांना टॅग केले. तथापि, चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेबाबत कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. – जगदीश काळे

Check Also

गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी

बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र …