लेख-समिक्षण

कामराची टीका, शिंदेसैनिकांची गुंडागर्दी

400 वर्षांपूर्वी मरण पावलेल्या औरंगजेबानंतर महायुती सरकारला कुणाल कामरा नावाचा नवीन बळीचा बकरा सापडला आहे. एक महिन्यापूर्वी केलेल्या कार्यक्रमावरून आणि विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होऊन 10 दिवसानंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात सरकारने हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. तत्पूर्वी त्याच गुन्ह्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेला आणि ईडीला घाबरलेल्या राहुल कनालच्या नेतृत्वात शिंदेसैनिकांनी कुणाल कामरा याने वादग्रस्त गाणं म्हटलेल्या हॉटेलची तोडफोड केली. त्याच्या सोबतीला मुंबई महापालिकेचे अतिक्रमण तोडू पथकानेही हॉटेलवर कारवाई केली. त्याच वेळी, कुणाल कामरा याने ‘अपुन झुकेगा नही’ अशीच भूमिका घेत ट्विटरवर एक फोटो शेअर करून त्याने सर्वांना आव्हान दिले आहे.
फेब्रुवारी महिन्यात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने आपल्या स्टँडअप शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता एक विडंबन गीत सादर केले. तसेच त्याच शोमध्ये केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचे नाव घेत गाण्यातून टीका केली. त्या कार्यक्रमाचा व्हिडिओ कुणाल कामरा याने आता मार्च महिन्यात सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा कुणाल कामरा याने अपमान झाल्याचा दावा करीत शिंदे यांचे काही कार्यकर्ते युनिकॉन्टीनेंटेल हॉटेलमध्ये पोहचले. त्याचे नेतृत्व ईडीची नोटीस येताच शिंदेसेनेत सहभागी झालेला व त्यापूर्वी आदित्य ठाकरे यांची आरती ओवाळणारा राहुल कनाल याने केले.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने जे काही विडंबन गीतात म्हटले, ते सर्व आणि त्यापेक्षाही वादग्रस्त टीका उद्धव ठाकरे सेनेचे अनेक नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवेसेना फोडली. ते गुवाहाटीला 40 आमदार घेऊन गेले. त्या गोष्टीवर एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटले गेले. त्यावर विडंम्बनात्मक गाण्यातून कामरा याने भाष्य केले आहे. त्याने एकनाथ शिंदे यांचे नाव न घेताच त्यांच्यावर टीका केली. त्याचा हा व्हिडीओ वार्‍याच्या वेगाने व्हायरल झाला असून नव्या वादाला तोंड फुटले आहे. मात्र यामुळे शिंदेसैनिक चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांचे डोकं फिरल्याने सोमवारी रात्रीच द युनिकॉन्टीनेंटेल हॉटेलमध्ये तोडफोड केली. चहूबाजूंनी कुणाल कामरावर टीकेची झोड उठली आहे. मात्र या वादानंतरही कुणालने ‘अपुन झुकेगा नही’ अशीच भूमिका घेतली असून तो सध्या मुंबईतून फरार आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर कुणालनेही आक्रमक भूमिका घेतली असून ‘मी पाँडिचेरीला आहे, काय उखाडता ते उखाडा’ अशी धमकीच त्याने शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना दिली आहे.
कॉमेडियन कुणाल कामरा याने दिल तो पागल है चित्रपटातील भोलीसी सूरत या गाण्याच्या चालीवर त्याचे विडंबनात्मक गीत गायले आहे. त्यात तो म्हणतो की, महाराष्ट्र इलेक्शन में इन्होने जो किया है बोलना पडेगा. यहांपे पहले इन्होने क्या किया? शिवसेना बीजेपीसे बाहर आ गयी. उसके बाद शिवसेना शिवसेनासे बाहर आ गयी, एनसीपी एनसीपीसे बाहर आ गयी. एक व्होटर को नौ बटन दे दिये. सब कन्फ्युज हो गये. चालू एक जन ने किया था. वो मुंबई में एक बहोत बढिया डिस्ट्रिक्ट है थाने. वहाँ से आते है.. अशी सुरूवात करत नंतर कुणालने ते गाण गायले आहे. त्याचा व्हिडीओही त्याने त्याच्या अकाऊंटवर शेअर केला होता. ‘कुनाल की कमाल! जय महाराष्ट्र!’ असे लिहीत संजय राऊतांनी कुणालचे कौतुक केले आणि तो व्हिडीओही शेअर केला. पण त्यापैकी कुणावरही कारवाई न करता सरकारमधील दोन आमदारांनी कुणाल कामरा व सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग दाखल केला आहे.

Check Also

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …