लेख-समिक्षण

जोडीदारला मानसिक आजार असेल्यास

नातेसंबंध चांगले चालवण्यासाठी जोडप्यांमध्ये योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. सध्याच्या ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे मानसिक आजाराने ग्रस्त असणार्‍यांची संख्या वाढत आहे. आपला जोडीदारदेखील काही मानसिक आजाराने ग्रस्त असेल तर त्याचा वैवाहिकत आणि कौटुंबिक नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मानसिक आजार जडलेल्या व्यक्तीसोबत डील करणे, त्याला समजावून सांगणे हे खूप क्लिष्ट असते. यासाठी काही मौलिक सल्ले
1) मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असणार्‍या किंवा मनोविकार जडलेल्या जोडीदाराशी बोलतो तेव्हा त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. बोलताना व्यत्यय आणू नका किंवा सल्ला देऊ नका. संपूर्ण गोष्ट ऐकून आणि समजून घेतल्यानंतरच काहीतरी बोला. कारण जे लोक मानसिक समस्यांशी झुंजत असतात ते सहसा कुणाचेही काहीही ऐकायला तयार नसतात.
2) स्वत:ची काळजी घेणे तुम्हाला तुमचे नाते मजबूत करण्यास आणि तुमच्या जोडीदाराची काळजी घेण्याची क्षमता सुधारण्यासाठी आवश्यक आहे. हे करत असताना शक्य झाल्यास जोडीदारासोबत व्यायाम करा, सकस आहार घ्या आणि चांगली झोप घ्या. यामुळे तुमचे नातेही सुधारण्यास मदत होईल आणि दोघांचे आरोग्यही राखले जाईल.
3) एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार झाला की त्याचा स्वभाव बदलतो. अशा परिस्थितीत सदर व्यक्तीचे मूड स्विंग खूप वेगाने होतात. हे स्वीकारा. त्यानुसार जोडीदाराच्या हातून एखादी चूक झाल्यास त्याच्यावर रागावू नका. त्याला नंतर समजावून सांगू शकता. परंतु तुमचा अतिराग त्यांना नव्याने चुकीच्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करू शकतो.
4) मानसिक आजार असणार्‍या व्यक्तीला सतत स्वतःची स्पेस हवी असते. एकांत हवा असतो. तो सुयोग्य प्रकारे दिला गेल्यास त्यांच्या वागणुकीत फरक पडतो. त्यानुसार आपल्या जोडीदाराचे निरीक्षण करुन त्याची स्पेस जपा. त्याच्या मर्यादांचा आदर करा आणि त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी वेळ द्या.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …