मगरीला ‘हँगमन ऑफ वॉटर’ म्हणतात. तिच्या परिसरात मोठमोठे प्राणी सापडल्यानंतर ती त्यांची अशा भयानक पद्धतीने शिकार करते की, तिला पाहून जीवाचा थरथराट होईल. सर्वप्रथम ती भक्ष्याला तिच्या जबड्यात पकडते. यानंतर ती अनेक वेळा आपले शरीर 360 अंश वळवते. यामुळे शिकार केलेल्या प्राण्याच्या हाडांचा चक्काचूर होतो. त्यानंतर ती आपली शिकार भक्षण करते. मगर काही वेळा सिंह व बिबट्यासारख्या प्राण्यांचीही शिकार करते. हे प्राणी एका टप्प्यात आल्यानंतर मगर त्यांच्यावर क्षणार्धात झडप घालणार, हे जणू ठरलेलेच असते. डोळ्याचे पाते लवते ना लवते, तोवर मगरीने आपले सावज टिपलेले असते, हे ओघानेच आले. मात्र, हीच मगर अगदी झोपताना देखील आपला एक डोळा उघडा का ठेवते, याचे कारण अर्थातच थक्क करणारे आहे. झडप घातल्यानंतर मगर आपल्या मजबूत जबड्याने सावजाची मान पकडते आणि त्यांना खोल पाण्यात ओढते. अशा धोकादायक मगरीने एक डोळा उघडा ठेवून झोपणे अर्थातच आश्चर्याचे आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यामुळे एक डोळा उघडा ठेवल्याने मगरीचा मेंदू सक्रिय राहतो. यामुळे, मगर झोपलेली असेल, असे समजून एखादा प्राणी मगरीजवळ जात असेल, तर त्यावेळीही मगरीची झडप ठरलेलीच असते.
मगरीने एक डोळा उघडा ठेवून झोपण्याचे आणखी एक कारण म्हणजे ती झोपेतही आपल्या सावजावर लक्ष ठेवून असते. झोपेतही तिचे सर्व लक्ष आपल्या टप्प्यात एखादा प्राणी येतो का, यावर असते, जेणेकरून झोपेतही भक्ष्यावर वार करून त्याला टिपता येईल. याशिवाय, आपल्याला एखादा धोका नको, यासाठीही मगर सजग असते आणि हे देखील यामागील आणखी एक महत्त्वाचे कारण आहे.
Check Also
दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती
जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …
पांचजन्य वृत्तपत्र