लेख-समिक्षण

सर्वात पातळ काच!

जगातील सर्वात पातळ काच कुठे शोधण्यात आली हे तुम्हाला माहिती आहे का? अपघातानेच हा शोध लागला होता व या काचेची जाडी दोन अणूंइतकी आहे. कॉर्नेल व जर्मनीच्या उल्म विद्यापीठाच्या संशोधकांनी शोधलेली काच ही सर्वात पातळ काच म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंदली गेली आहे. या काचेचे तावदान इतके पातळ आहे, की त्याचे सिलिकॉन व ऑक्सिजन रेणू हे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकने दिसले, असे प्रा. डेव्हिड म्यूलर यांनी सांगितले. केवळ दोन अणूंइतकी जाडी व द्विमिती हे या काचेचे वैशिष्ट्य असून हा अपघाताने लागलेला शोध आहे, असे ते म्हणाले. जगात प्रथमच काचेची रचना पाहता आली याचा आपल्याला अभिमान वाटतो, असे म्यूलर यांनी सांगितले. या द्विमिती काचेचे उपयोग ट्रान्झिस्टर, अतिशय पातळ घटक जे संगणक व स्मार्टफोनच्या संस्कारकाची क्रिया आणखी बदलून टाकतील. नॅनो लेटर्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झालेले आहे. वैज्ञानिक ग्राफिन कार्बन अणूंचे द्विमितीय तावदान तयार करीत असताना स्फटिक तयार झाले, पण त्या ग्राफिनवर घाणीसारखा पदार्थ जमलेला दिसला. नंतर निरीक्षण केले असता ती काच होती व सिलिकॉन ऑक्सिजनच्या अणूंनी बनलेली होती. या प्रयोगातून सुटलेली हवा तांब्याला क्वार्टझ् स्फटिकाशी क्रिया करायला भाग पाडत होती. क्वार्टझ हे सिलिकॉन व ऑक्सिजनचे बनलेले असते. हा काचेचा थर शुद्ध ग्राफिनवर तयार झाला. वैज्ञानिकांना यामुळे काचेच्या मूलभूत स्वरूपाविषयी माहिती मिळाली. वैज्ञानिकांना ही काच तयार झाले सहज दिसली नाही. ही काच घन अवस्थेसारखी वागते, पण ती द्रव आहे. वैज्ञानिकांना काचेच्या अणूंची छायाचित्रे मिळाली असून ती 1932 मध्ये काचेच्या अणुरचनेवर संशोधन केलेल्या डब्ल्यू एच झशारियासेन यांनी सांगितलेल्या रचेनशी मिळतीजुळती आहे.

Check Also

जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी

तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप …