लेख-समिक्षण

कुशनच्या दुनियेत

कुशन खरेदी करताना…
•कुशन हे नेहमी सोफा किंवा बेडच्या आकाराप्रमाणे असावेत, खूप मोठे किंवा खूप लहान नसावेत.
•सोफा किंवा बेडवर आवश्यकतेपेक्षा जास्त कुशन ठेवू नका.
•नेहमी गोलाकार, आयताकृती किंवा चौकोनी आकाराच्या उशा घ्या.
•लिव्हिंग रूमच्या भिंती आणि सोफ्याच्या रंगाशी जुळणारे कुशन कव्हर्सचा रंग आणि पॅटर्न निवडा.
बेडरुम आणि लिव्हिंग रूममध्ये ठेवलेले फर्निचरच नाही तर त्यामध्ये सजवलेल्या गाद्याही बेडरुम आणि लिव्हिंग रूमला आकर्षक बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. घर सुंदर दिसण्यासाठी कुशनची निवडही महत्त्वाची ठरते. बाजारात तुम्हाला अतिशय रंगीबेरंगी आणि आकर्षक डिझाईन्स असलेले कुशन कव्हर्स उपलब्ध आहेत, जे घराच्या सजावटीला स्टायलिश आणि क्लासी लुक देतील. दिवाणखान्यात, बेडरुममध्ये किंवा ड्रॉईंग रूममध्ये कुठेही या कुशनचा वापर करता येतो.
• लेस कव्हर असलेले कुशन घराच्या सजावटीला स्टायलिश लुक देतात. ज्यूट मटेरिअलपासून बनवलेल्या कुशन कव्हर्सची फॅब्रिक क्वालिटी खूप चांगली असते. तसेच ते शोभिवंत लुक देतात. हे कुशन कव्हर्स अतिशय मऊ आणि आरामदायी असतात. ते बहुरंगी आणि आकर्षक डिझाइन्समध्ये उपलब्ध आहेत.
• याखेरीज मखमली कुशन कव्हरही घराची शोभा वाढवतात. घराला रिच लुक द्यायचा असेल तर भरतकाम केलेले कुशन कव्हर वापरता येतील. विशेषतः विविध प्रकारच्या कापडांपासून बनवलेले नक्षीदार कुशन कव्हर्स घराला खूप सुंदर लुक देतील.
• एथनिक कुशन कव्हर्स पार्टी किंवा फंक्शन्समध्ये तुमच्या घराला पूर्णपणे वेगळा लुक देतात. त्यात मणी, मोती आणि सुंदर लेस देखील वापरले जातात.
• ट्रेंडचा विचार केल्यास सध्या मुलांच्या खोलीसाठी ग्राफिक डिझाइन केलेले कुशन कव्हर्स चलतीत आहेत. यात तुम्हाला कार्टून कॅरेक्टर्ससह कुशन कव्हर्स मिळू शकतात. हवे असल्यास त्यावर मुलांचे फोटो प्रिंट करून घेऊ शकता. याशिवाय मुलांच्या खोलीत तुम्ही थ्रीडी प्रिंटेड कुशनही वापरू शकता. बेडरूमला लक्झरी लुक द्यायचा असेल तर नैसर्गिक रंगाचे कुशन कव्हर्स वापरा.

Check Also

लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत

लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …