थंडीचे दिवस सुरू झाले की बहुतांश लोक घरातील एअर कंडिशनर, फॅनचा वापर बंद करतात.रेफ्रिजरेटरचे पाणी पिणेही बंद करतात. किंबहुना, फ्रीजचा वापरही कमी होतो. संपूर्ण हिवाळ्यात मर्यादित तापमानात फ्रीज चालवू शकतो. पाण्याच्या बाटल्या फ्रीजमध्ये ठेवणे बंद केले असेल तर तुम्ही ते कमी तापमानावर देखील सेट करू शकता. हिवाळ्यात, दूध, भाज्या, फळे, शिजवलेले अन्न ताजे ठेवणसाठी तुम्ही कमी तापमान ठेवूनही काम करू शकता. असे केल्याने वीज बिलही कमी होईल.
एक गोष्ट लक्षात घ्या, हिवाळ्यात रेफ्रिजरेटरचे तापमान खूप जास्त किंवा खूप कमी सेट करू नका. ते साधारण 2 अंश ते 5 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवावे. रेफ्रिजरेटरच्या लिटर, वॅट आणि आकारानुसार तापमान सेट करावे. या तापमानात कोणतेही अन्न किंवा पेय खराब होणार नाही आणि दीर्घकाळ ताजे राहील. वीज बिलही कमी होईल.
हिवाळ्यातच नव्हे तर कोणत्याही ऋतूत वीजबिल वाचवण्यासाठी रेफ्रिजरेटर बंद करणे पूर्णतः चुकीचे आहे. यामुळे फ्रीज खराब देखील होऊ शकतो. त्याऐवजी कमी तापमानात सेट करून वापरत राहणे चांगले आहे.
Check Also
लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत
लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …
पांचजन्य वृत्तपत्र