लेख-समिक्षण

क्रीडा क्षेत्रात करिअर करायचंय?

करिअर करण्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी दिशा असते. कुणाला डॉक्टर व्हायचे असते. तर कुणाला इंजिनिअर. तर कुणाला देशसेवा करायचे म्हणून आर्मी, नेव्ही जॉईन केली जाते. पण स्पोर्टस्मध्ये करिअर करायचे असल्यास मात्र त्यासाठी तुम्हाला आवडत्या खेळात प्राविण्य मिळवायला हवे. खास करुन मुलींसाठी स्पोर्टस्मध्ये करिअर करणे तारेवरची कसरत होऊ शकते.
आपल्याकडे सानिया मिर्झा, सायना नेहवाल, पी. टी. उषा, मेरीकॉम अशा आपआपल्या खेळात ठसा उमटविणार्‍या महिला खेळाडूंची नावे घेता येतील. यातील काही अपवाद वगळला तर यशाच्या शिखरापर्यंत जाण्याचा त्यांचा प्रवास फार खडतर असतो, हे थोडे लक्षात घ्यायला हवे. सर्वांनाच यांच्यासारखे प्रोत्साहन देणारे प्रशिक्षक मिळाले तर काहीच हरकत नाही. चक दे इंडिया आपण सर्वांनीच पाहिला आहे. त्यातील हॉकी प्रशिक्षक जीव तोडून देशासाठी टीम तयार करत असतो.
स्पोर्टस्कडे वळताना मुलींनी मात्र सावधातना आणि जागरुकता दाखविली पाहिजे. बाहेर गावी मॅचेस असताना आपल्या संरक्षणाची जबाबदारी प्रशिक्षकाबरोबरच स्वत:ही घ्यायला शिकले पाहिजे. तसेच माणूस वाचण्याची कलाही अवगत असली पाहिजे. नाही तर खेळाबरोबर फसवणूकही होण्याची शक्यता असते.(बर्‍याच दिवसापूर्वी काही मुलींनी प्रशिक्षकांनी अत्याचार केल्यामुळे सामूहिकरित्या आत्महत्या करण्याचा प्रकार उघडकीस आला होता.) जर तुमच्यावर असा काही प्रसंग ओढवला असल्यास किंवा तुमच्याशी कुणी गैर वागण्याचा प्रयत्न करतो, अशी कल्पना आलीतर प्रथम तुम्ही तुमच्या पालकांना हा प्रकार कळवा. खेळातील करिअर अर्ध्यावर सोडावे लागले तरी हरकत नाही. पण आपल्या शहरात परत येऊन स्वत:ला सुरक्षित ठेवा. तुम्हाला तोंड दाबून बुक्यांचा मार… असा प्रकार होत असेल तर ते करिअर नव्हे. अशा व्यक्तींना धडा शिकवण्यासाठी तुम्ही कायद्याचा आधार घेऊ शकता. चुकीचे वर्तन करणार्‍या एका व्यक्तीला शिक्षा झालेली जगभर कळली, तर दुसरी व्यक्ती चुकीचे वागताना थोडी घाबरुनच राहील. तुमचा एक विश्वास आणि धाडस अनेकांच्या करिअरला उभारी आणि यशाचा उज्वल मार्ग दाखविणाारा ठरेल.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …