सध्या शर्टचे पॅटर्न बदल असल्यामुळे नव्या स्टाईलच्या शर्टना खूप मागणी आहे. तरुणाईचा विचार करता मुलींची पहिली पसंती या शर्टला आहे. मुलींसाटी क्रेप, शिफॉन, डेनिम, जॉर्जेट, लिनन, लेस अशा कापडांच्या प्रकारात शर्ट उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या स्टाईल आणि रंगही यात आहेत.
श्रकॉलरमध्ये विविधता ः शर्टच्या स्टाईलमध्ये विविधता आणण्यासाठी हल्ली कॉलरमध्ये वेगळेपणा आणला जातो. त्यात टाय नॉट पासून यू कॉलर असे प्रकार हाताळले जात आहेत. तर पॅटर्नमध्ये विचार करता एका रंगाच्या कॉटन शर्टपासून ते चेक, स्ट्राईप किंवा विरुद्ध रंगाचा वापर केलेले निरनिराळे पॅटर्नच दिसतील. त्याशिवाय कॉटनच्या पांढर्या रंगाच्या शर्टवर वेगळ्या रंगाच्या प्रिंटसचा सुद्धा वापर करता येतो. किंवा पांढर्या रंगाच्या शर्टाच्या बटणांच्या ठिकाणी, बाहीच्या बटणाच्या ठिकाणी, कॉलरच्या जागी वेगळ्या रंगाचा वापर करुन स्टाईल केलेली असते. पण जर आपल्याला एकाच रंगातील शर्ट परिधान करायचा असेल तरीही पांढर्या रंगाव्यतिरिक्त गुलाबी, केशरी, आकाशी किंवा पेस्टल शेडसच्या शर्टाचा पर्याय आपल्याला उपलब्ध आहेच.
श्रशर्ट ड्रेसेस ः शर्ट ड्रेस हा बाजारात आलेला नवीन प्रकार आहे. शर्टला ड्रेससारखे घालता येते. सामान्य उंची असणार्या शर्टपेक्षा याची उंची अधिक असते. त्यामुळे हा शर्ट आपल्याला ड्रेस म्हणून घातला येईल. या शर्टला समोरच्या बाजूला बटणं असतात. हा ड्रेस अधिक स्टाईलिश बनवायचा असेल तर त्यावर पट्टाही घालू शकता. हल्ली शर्टला पुढे बटणं असतातच पण बाजूला जो कट दिलेला असतो तिथेही बटणं लावलेली असतात. त्यामुळे आपल्याला जसे आरामदायी वाटेल तसे आपण हा शर्ट घालू शकतो.
जीन्स किंवा ट्राऊझर्स बरोबर हे शर्ट आपण घालू शकतो. त्याशिवाय हाय वेस्ट शॉर्टस, थ्री फोर्थ स्कर्ट, ऑफिसला जाताना घालण्याच्या पँटस याबरोबर हा शर्ट उत्तम दिसून येईल.
Check Also
जन्मानंतर बाळाचा रंग सावळा का होतो ?
बाळ जन्माला आले की, त्याचे गुलाबी-पांढरे रूप पाहून सर्वच जण सुखावतात. मात्र, काही आठवड्यांनंतर हळूहळू …
पांचजन्य वृत्तपत्र