लेख-समिक्षण

‘वाय-फाय’ चा स्पीड वाढवा

वाय-फाय हा एक रेडिओ लहरी असून यात अनेक गोष्टी अडथळे आणू शकतात. मात्र उत्तम दर्जाचे वाय-फाय सिग्नल मिळत असेल तर आपल्या डिव्हाईसवरील काम जलदगतीने आणि वेगाने होते. इंटरनेटचे स्पिड चांगली असल्याने कामेही लवकर उरकली जातात. घरात किंवा कार्यालयात असलेल्या राऊटरपासून स्पिड कशी मिळवावी, यासाठी काही टिप्स येथे आपल्याला सांगता येतील.
र्ीउभा अँटेना: राऊटर्सला एक अँटेना असतो आणि तो आपल्या सोयीने उभा करतो. राऊटरचा अँटेना नेहमी सरळ आणि उभा कसा ठेवता येईल, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. कधी कधी अ‍ॅटेना वाकलेला, आडवा झालेला असतो. त्यामुळे वाय-फायचे सिग्नल चांगले मिळत नाही आणि त्याचा परिणाम स्पिडवर होतो. आपल्याला वाटते की, इंटरनेला प्रॉब्लेम आहे. मात्र अ‍ॅटेंनाकडे लक्ष ठेवले तर निम्मे प्रश्न आपले निकाली लागतात.
र्ीराऊटरची जागा: राऊटरच्या जागेवरूनही वायफायची गती अवलंबून असते. तुमचा घराचा हॉल किंवा ऑफीसची खोली मोठी असेल तर राऊटर मधोमध ठेवण्याची दक्षता घेतली पाहिजे. तरच सगळीकडे वायफायचे चांगले सिग्नल मिळू शकतात. एका बाजूला, कोपर्‍यात आपण राऊटर ठेवले तर आपल्या डिव्हाईसला कमकुवत सिग्नल मिळते. परिणामी कामे वेगाने पार पाडण्याऐवजी बराच काळ घेतात. जर एखाद्या ठिकाणी राऊटर ठेवून चांगले सिग्नल मिळत नसेल तर जागा बदलून सिग्नल कोठून चांगले मिळते, हे तपासून पाहणे गरजेचे आहे. सर्वप्रकारच्या डिव्हाईसला आणि घरात चांगल्या प्रतिचे वायफाय सिग्नल ज्या ठिकाणाहून मिळेल, तेथे राऊटर ठेवण्यास प्राधान्य द्यायला हवे. राऊटरजवळ जड लोखंडी वस्तू ठेवण्याचे टाळले पाहिजे, जेणेकरून सिग्नलला अडचणी येणार नाहीत. उदा. लोखंडी कपाट, रॅक आदी. त्यापेक्षा लाकडी किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू या सिग्नलला अडथळे आणत नाहीत. म्हणूनच राऊटरची जागा ही सिग्नलसाठी महत्त्वाची ठरते.
र्ीउच्च प्रतिचे वाय-फाय निवड: वायफाय कनेक्शन निवडीसाठी आपल्यासमोर आज अनेक कंपन्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. आपण ज्या भागात राहतो, तेथे कोणते नेटवर्क चांगले आहे, याची चाचपणी करूनच आपण वायफायची निवड केली पाहिजे. आपल्या इमारतीत अन्य राऊटरचा परिणामही आपल्या राऊटरवर होऊ शकतो. त्यामुळे सिग्नलला अडथळे येतात. फ्लॅटमुळे राऊंटरचा एकमेकात हस्तक्षेप होण्यास वाव मिळतो.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …