अलाया एफने पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या आहेत आणि तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या अभिनेत्रीने ’जवानी जानेमन’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि ’फ्रेडी’, ’बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ’शीकांत’ सारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला.
आलियाच्या पुढील चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटवर एक मोठे अपडेट समोर आले आहे. ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये अलाया एफ दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘खो गये हम कहाँ’च्या सिक्वेलमध्ये अलया एफ दिसणार आहे. सिक्वेलमध्ये ती सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि आदर्श गौरवसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
अर्जुन वरण सिंह दिग्दर्शित ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि आदर्श गौरव मुख्य भूमिकेत आहे. सोशल मीडियाच्या दबावाला न जुमानता आपले ध्येय आणि नातेसंबंध जोपासणार्या तीन मित्रांची ही कथा आहे. ‘खो गये हम कहाँ’ मध्ये कल्की केकलन, अन्या सिंग आणि रोहन गुरबक्सानी सहाय्यक भूमिकेत आहेत. अलाया एफ ने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत करिअरची चर्चा केली आणि विश्वासू व्यक्तींकडून प्रामाणिक अभिप्राय मिळवण्याच्या महत्त्वावर भर दिला. यावर्षी, अलाया एफने अक्षय कुमार आणि टायगर शॉफसोबत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये स्क्रीन स्पेस शेअर केली आणि ‘शीकांत’मध्ये राजकुमार रावसोबत दिसली. – मानसी जोशी
Check Also
गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी
बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र …
पांचजन्य वृत्तपत्र