आपला सेल्फी चांगला यावा यासाठी काही टिप्सही इथे सांगता येतील.
श्रकॅमेराकडे पाहू नका : वाचताना विचित्र वाटेल, पण तज्ञांच्या मते एक क्लासिक कॅडिंट फोटो काढण्यासाठी आपण कॅमेराकडे पाहू नये. विशेष म्हणजे सेल्फीमध्ये सर्वात मोठी अडचण हीच आहे. सेल्फीमध्ये सर्वच जण कॅमेराकडे पाहताना दिसतात. मात्र आपण थेट कॅमेराकडे पाहिल्यास आपले पोझ आकर्षक येणार नाही.
श्रस्वत:ला मध्यभागी नको : सेल्फी काढताना स्वत:ला ग्रुपच्या मध्यभागी ठेऊ नका. फोटो फ्रेममध्ये आपण स्वत:ला मधल्या जागेऐवजी थोडे डावीकडे किंवा उजवीकडे ठेवण्याचा प्रयत्न करा.
श्रहात किंवा सेल्फी स्टिकचा वापर: सेल्फीमध्ये हात किंवा सेल्फी स्टिक दिसायला नको. सेल्फी स्वत:चा किंवा मित्राचा असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून हात किंवा स्टिकचा फोटोत अडथळा येणार नाही, याची खबरदारी घ्या.
श्रकॅमेरा बटणने सेल्फी नको : जेव्हा आपण सेल्फी घेतो, तेहा त्यावेळी स्किनवर असलेल्या कॅमेरा बटनला टच करणे कठिण असते. त्यामुळे फोटो हलण्याचा धोका असतो. अशा स्थितीत जर आपण सेल्फ टायमरचा उपयोग केला तर फोटो आपल्या मनाप्रमाणे येऊ शकतो.
श्रझुम नको : सेल्फी काढताना झुमचा मोह टाळावा. कारण सर्वसाधारणपणे फोनमध्ये डिजिटल झुमची व्यवस्था असते आणि प्रत्येक वेळी झुमचा वापर केल्यास त्याचा दर्जा खराब होण्याची शक्यता राहते.
श्रब्यूटी फिल्टरचा वापर नको : सेल्फीवर ब्यूटी फिल्टरचा वापर करू नये. यामुळे फोटो खराब होण्याची शक्यता असते. यापेक्षा सेल्फी घेताना वातावरणातील नैसर्गिक प्रकाशाचा अंदाज घ्यावा. आपल्याला फिल्टरची गरज भासणार नाही.
Check Also
जन्मानंतर बाळाचा रंग सावळा का होतो ?
बाळ जन्माला आले की, त्याचे गुलाबी-पांढरे रूप पाहून सर्वच जण सुखावतात. मात्र, काही आठवड्यांनंतर हळूहळू …
पांचजन्य वृत्तपत्र