सोशल नेटवर्किंगमधील सर्वात लोकप्रिय असलेले फेसबुक आणि व्हॉटसअपमधील संदेश आता अधिक सुरक्षित केलेे आहेत. संदेशाची देवाणघेवाणीचा गैरवापर होऊ नये यासाठी फेसबुकने एंड टू एंड इंक्रिप्शनचा पर्याय आणला आहे. यामुळे संदेश अधिक सुरक्षित, संरक्षित राहण्यास मदत मिळणार आहे. या वैशिष्ट्याला आणखी एक नाव दिले आहे ते म्हणजे ‘सिक्रेट कर्न्व्हजन्स’. संदेश पाठविणारा आणि स्विकारणाच व्यक्ती आता तो संदेश पाहू शकणार आहे. सोशल मिडियामुळे अनेक गोपनिय माहिती देवाणघेवाण सोपी झाली आहे. त्यातून गैरप्रकारही घडले असून त्याचा फटका संबंधिताना देखील बसला आहे.
यापासून यूजरचे संरक्षण व्हावे यासाठी सोशल मिडियाने नवीन तंत्र आणले आहे, जेणेकरून मेसेज सुरक्षित राहू शकतो. फेसबुक आणि व्हाटसअपने आपल्या सेवेत एंड टू एंड इन्क्रिप्शनचा वापर सुरू केला आहे. मात्र हा सध्या पर्याय ठेवला असून ज्यांना हवा असेल, तो त्याचा वापर करू शकतो. काही मंडळी आपल्या डिव्हाइसमधील माहिती गोपनिय राहवी यासाठी काम करताना डिव्हाइस बंद करून ठेवतात. उदा, टॅबलेट, डेस्कटॉप कॉम्प्युटर, फोन आदी. गोपनीय देवाणघेवाण ही यूजरला सध्या मर्यादित स्वरुपात उपलब्ध आहेत. मात्र या वर्षाखेर ही सेवा सर्वांनाच उपलब्ध होईल.
Check Also
‘शेरेटिंग’चा मोह टाळाच !
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आनंदाचे क्षण जगासोबत शेअर करणे ही आता एक सामान्य बाब बनली …
पांचजन्य वृत्तपत्र