केस लांब, घनदाट, काळेभोर, चमकदार असतील तर ते सौंदर्यात भर घालतात म्हणूनच तर स्त्रिया ते जीवापाड जपण्याचा प्रयत्न करतात. अशा या जीव की प्राण असणा-या केसांची कशी काळजी घ्यावी व ते कशामुळे पांढरे होऊ शकतात हे जाणून घेऊया.
केस पांढरे होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण केस वेळेआधी पांढरे होऊ लागले तर वैद्यकीय भाषेत याला कैनिटाइस असं म्हटलं जातं. जेव्हा वय वाढत जातं तेव्हा शरीरात मेलेनिनचं उत्पादन कमी होत जातं. मेलेनिन हा घटक असतो जो केसांना रंग प्रदान करतो. म्हातारपणात शरीरातील मेलेनिनची पातळी कमी होत जाते आणि याच कारणामुळे वाढत्या वयासोबतच केस पांढरे होत जातात. पण कमी वयात केस पांढरे होऊ लागल्यास शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वांची पूर्तता होऊ शकत नाहीये, असे समजावे.
शरीरातील प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होणं ही एक सामान्य कारण आहे. शरीरातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता देखील यामागचं कारण असू शकतं. यामध्ये बी 12 हे व्हिटॅमिन महत्त्वाचे आहे. त्यामुळे बी-12 जीवनसत्वाचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात मसूर, संपूर्ण धान्य, काजू, दूध, दही,पनीर ,अंडी, हिरव्या पालेभाज्या, गहू, मशरूम, वाटाणा,सूर्यफूल बिया, मासे, मांस, रताळे,सोयाबीन,बटाटा,पालक,केळी, बीन्स, ब्रोकोली यांचा समावेश करावा.
मसाज करताना चेहरा रगडू नका. यामुळे त्वचेचे नुकसान होते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय तुम्ही करू शकता.
Check Also
लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत
लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …
पांचजन्य वृत्तपत्र