मॅडॉक फिल्म्सच्या थरारक आणि विनोदी विश्वात आता एका नव्या अध्यायाची नांदी झाली असून, ‘मर्दानी 2’ मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा अभिनेता विशाल जेठवा एका नव्या रूपात समोर येण्यास सज्ज झाला आहे. विशालने ‘शक्ती शालिनी’ हा बिग बजेट चित्रपट स्वीकारला असून, यात तो अभिनेत्री अनीत पड्डासोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. दिनेश विजन यांच्या या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सने आजवर ‘स्त्री’ आणि ‘मुंज्या’ सारख्या चित्रपटांमधून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे या आगामी प्रकल्पाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
या चित्रपटाचे चित्रीकरण येत्या मार्च महिन्यापासून सुरू होणार असून, विशाल या चित्रपटात मुख्य नायिकेच्या प्रियकराची भूमिका साकारत आहे. आतापर्यंत आपल्या तीव्र आणि नकारात्मक भूमिकांसाठी नावाजला गेलेला या निमित्ताने रोमँटिक भूमिकेत आपली छाप पाडण्यासाठी विशाल सज्ज झाला आहे. या युनिव्हर्समधील इतर चित्रपटांप्रमाणेच तांत्रिक बाजू आणि संगीत यावरही मोठा खर्च केला जाणार आहे.- मंगेश टकले
Check Also
रुपेरी पडद्यावरील ‘झुला’
हिरवाईने नटलेली बाग, झाडाच्या फांदीला बांधलेला झुला आणि त्यावर झुलणारी नायिका… हिंदी चित्रपटातील हे दृश्य …
पांचजन्य वृत्तपत्र