मुंबईत सोमवारला दिवसभर पडलेला मुसळधार पाऊस आणि ढगाळी वातावरणामुळे दाणादाण उडाली असताना या वाईट हवामानाचा फटका मुंबई-अमरावती फ्लाईटला बसला. त्याच वेळी राज्यात झालेल्या अतिवृष्टीने केवळ पाच दिवसांत २१ जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये पाण्यात बुडून, वीज कोसळून, भिंत पडून मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. याशिवाय सुमारे २२ प्राण्यांचाही पावसामुळे मृत्यू झाला आहे. पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. या परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यांनी ज्या ठिकाणी नुकसान झाले, तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई आणि उपनगराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. मस्जिद रेल्वे स्थानकात पाणी साचल्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची सेवा ठप्प झाली होती. मुंबई मेट्रो ३ मार्गावरील आचार्य अत्रे स्थानक, वरळीतील भुयारी स्थानकात पावसाचे पाणी शिरले. पुणे शहर आणि परिसरातील पावसाची तीव्रता वाढून अतिवृष्टीचा कहर झाला. पुण्यामध्ये एकूण तीन जणांचा मृत्यू झाला. त्यातील एकाचा अंगावर झाड पडून, तर दुसक्तयाचा भिंत पडून आणि तिा. जालन्यात दोघांचा पाण्यात बुडून तर अहिल्यानगरमध्ये दोघांचा अंगावर भिंत पडल्याने मृत्यू झाला. यामध्ये मुंबई शहरात झाड पडून एक मृत्यू, मुंबई उपनगरातही झाड पडून एक मृत्यू, नागपूर, चंद्रपूर, भंडारा व वर्धा जिल्ह्यात वीज पडून प्रत्येकी एक मृत्यू, नांदेड जिल्ह्यात पाण्यात बुडून तीन जणांचा मृत्यू, यवतमाळ व बीडमध्ये पाण्यात बुडून प्रत्येकी एक मृत्यू आणि गोंदिया जिल्ह्यात पावसात एक मृत्यू, कोकणातील रायगड जिल्ह्यातही एक मृत्यू झाला आहे.
राज्यात वेळेआधी दाखल झालेल्या मान्सूनमुळे पिकांच्या बाधित क्षेत्राचा आकडा आणखी वाढून ४० हजार ९४९ हेटरवर पोहोचला आहे. त्यामध्ये उन्हाळी हंगामातील बहुतांश पिके शेतकर्यांच्या हातची गेली असून, हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अमरावती, बुलडाणा, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना सर्वाधिक तडाखा बसल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मुसळधार पावसाने जीेवितहानी आणि पिकांचे नुकसान झाले असताना मुंबईवरून अमरावती विमानतळावर नियोजित वेळेपेक्षा तब्बल दोन तास विलंबाने सायंकाळी ५.३० वाजता फ्लाईट पोहचली आणि लगेच प्रवासी घेवून निघणार होती. मात्र फ्युएल ट्रक चिखलात फसला अन् विमानापर्यंत पोहचू शकला नाही. त्यामुळे सोमवारची रिटर्न मुंबई फेरी रद्दच करण्यात आली असून प्रवाशांना परत जावे लागले. त्यामुळे अमरावती विमानतळावर विमान मुक्कामी होते. सोमवारला दिवसभर मुंबईत जोरदार पाऊस सुरु होता. वाईट हवामानामुळे रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. त्याचाच परीणाम म्हणजे मुंबईवरून दुपारी ३.३० वा. पोहचणारी फ्लाईट अमरावतीत सोमवारला सायंकाळी ५.३० वा. सुमारास पोहोचली. वाईट हवामान पाहता, सूर्यास्त होण्यापूर्वी लगेच अमरावतीवरून मुंबईकडे हि फ्लाईट निघणार होती. दरम्यान विमानात इंधन भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. यासाठी विमानतळामध्येच एका बाजुला असलेला फ्युएल ट्रक सोमवारला झालेल्या पावसामुळे चिखलामध्ये अडकला. हा ट्रक तत्काळ बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र प्रयत्न करता-करताच सूर्यास्त झाला आणि गणित बिघडले.अमरावती विमानतळावर नाईट लँडींग आणि उड्डाणही सुविधा नाही. फ्युएल टँक चिखलातून बाहेर निघेपर्यंत सूर्यास्त झाला होता. त्यामुळे सोमवारची मुंबईला परत जाणारी फ्लाईट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सोमवारला मुंबईला जाणार्या प्रवाशांना परत जावे लागले. ही फ्लाईट मंगळवारला दुपारी मुंबईला रवाना झाली.
मोर्शी तालुयातील रिद्धपूर मंडळात खेड, तळेगाव, धामणगाव आणि आष्टगाव तसेच चांदूरबाजार तालुयातील परिसरात आकाशातून एक विमान भूपृष्ठाजवळ घिरट्या घालताना नागरिकांना स्पष्टपणे दिसले. हे विमान जवळपास अर्धा तास या भागात घिरट्या घालत होते. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने सदर विमान भूपृष्ठावरील जलस्त्रोतांचे पर्यवेक्षण करण्यासाठी यंत्रणेकडून वापरण्यात आले आहे. या विमानाद्वारे भागातील पाण्याच्या साठ्याची माहिती घेतली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र