राजकुमार हिरानी आणि रणबीर कपूर यांचा चित्रपट अनिश्चित काासाठी लटकला आहे. राजकुमार आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच एकत्र येत होते. मात्र दोघांच्या चाहत्यांची आता निराशा झाली आहे. आमिर खानमुळे हा चित्रपट लांबणार असल्याची माहिती आहे. ‘दादासाहेब फाळके’ यांच्या आयुष्यावर आधारीत असा चित्रपट तयार करण्याचा मानस राजकुमार हिरानी यांचा होता. त्यासाठी आमिर खानची निवड करण्यात आली. आमिर खानने या चित्रपटासाठी अनेक चित्रपट सोडले. महत्त्वाचे म्हणजे फाळकेंच्या आयुष्यावर दक्षिणेतही चित्रपट निर्मिती होत आहे. आमिरच्या सांगण्यावरुन या चित्रपटाची कथा नव्याने लिहिली जात आहे. राजकुमार हिरानी यात व्यस्त आहेत. यामुळे राजकुमार आणि रणबीरच्या चित्रपटाला विलंब लागणार आहे. दुसरीकडे रणबीर कपूर ‘रामायण’ च्या दुसर्या भागाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यानंतर तो ‘एनिमल पार्क’ या चित्रपटाला सुरुवात करणार आहे. त्यामुळे हिरानींचा चित्रपट २०२७-२०२८ मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे.- नरेंद्र क्षीरसागर
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र