लेख-समिक्षण

मुख्यमंत्री योगींच्या चित्रपटाचा मार्ग मोकळा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या एकाही दृश्याला कात्री लावण्यात आलेली नाही. सेंसर बोर्डाला वारंवार आदेश देऊनही प्रदर्शन प्रमाणपत्र देण्यात येत नव्हते. त्यामुळे निर्मात्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने स्वत: चित्रपट पाहिला आणि निर्णय दिला की, चित्रपटात काहीही आक्षेपार्ह नाही. त्यामुळे, कोणतीही कापाकापी न करता तो प्रदर्शित करता येईल, असा स्पष्ट आदेश दिला. न्यायालयाला सांगण्यात आले की, हा चित्रपट काल्पनिक असून, तो काही प्रमाणात वास्तवावर आधारित आहे, यासंदर्भातील स्पष्ट सूचना सुरुवातीलाच दाखवण्यात येईल. कोर्टाने याची नोंद घेतली. ‘द मंक हू बिकेम चीफ मिनिस्टर’ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, ट्रेलर आणि गाण्यालाही सेंसर प्रमाणपत्र न मिळाल्याने प्रदर्शन लांबणीवर गेले. यामुळे निर्मात्यांनी सीबीएफसीवर मनमानीचा आरोप करत कोर्टात धाव घेतली होती. सर्व कायदेशीर अडथळे दूर झाल्यानंतर आता चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. निर्माते सम्राट सिनेमॅटिस यांनी यावर आनंद व्यक्त केला आहे.- स्वाती देसाई

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …