स्वप्न पडणे ही सामान्य गोष्ट आहे. जवळपास प्रत्येक मनुष्याला हा अनुभव येतो. पण माणसाप्रमाणे प्राण्यांनादेखील स्वप्न पडतात, असे संशोधनातून समोर आले आहे. अनेक महान तत्त्वज्ञानी, शास्त्रज्ञांनीदेखील यावर भाष्य केले आहे. प्राण्यांना स्वप्न कसे पडते, स्वप्न पडताना त्यांच्या शारीरिक हालचाली कशा असतात आणि याबाबत विज्ञान काय सांगते, ते लक्षवेधी आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेले संशोधन आणि जगभरात झालेल्या वेगवेगळ्या अभ्यासात प्राण्यांना झोपेत स्वप्न पडतात ही बाब अधोरेखित झाली आहे.
ग्रीक तत्त्वज्ञ अरस्तू यांनी ‘यद हिस्ट्री ऑफ अनिमल्सय’ या पुस्तकात असे लिहिले आहे की, केवळ माणसालाच स्वप्न पडत नाही तर कुत्रेदेखील झोपेत स्वप्न पाहून भुंकतात. प्राणी हे बुद्धिमान असतात ही बाब प्राचीन कहाण्यांपासून ते आधुनिक विज्ञानापर्यंतच्या अनेक उदाहरणांवरून दिसून येते. आपल्या बुद्धीच्या जोरावर ते खाद्य आणि आसर्याचा शोध घेतात. शिकारींपासून बचाव करायला शिकतात.
हे पाळीव बनल्यावर माणसाप्रमाणे वर्तन करण्याचा प्रयत्न करतात. हे दीर्घकाळापासून चालत आले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती झोपतो तेव्हा तेवढ्या वेळेपुरता त्याचा मेंदू निष्क्रिय होतो, असे मानले जात होते. १९५० मध्ये शास्त्रज्ञांनी झोपेची रॅपिड आय मूव्हमेंट अर्थात आरईएम ही संज्ञा शोधून काढली. हा झोपेचा एक टप्पा मानला जातो. या टप्प्यात स्वप्न पडते. ही झोपेची अशी वेळ असते, ज्यावेळी पापण्यांमागे आपले डोळे वेगाने फिरत असतात. यावेळी हृदयाचे ठोके वाढतात, धाप लागते, स्वप्नात तुम्हाला या गोष्टी जाणवतात आणि जेव्हा जाग येते, त्यावेळी हृदय धडधडत असते. माणसांप्रमाणे अनेक मोठ्या प्राण्यांचा मेंदू आणि न्युरॉन्स जटिल असतात. या पेशी विद्युत संकेत तयार करून मेंदूला पाठवतात. झोपेतदेखील ही प्रक्रिया सुरू असते.
केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूटसोबत केलेल्या अभ्यासात प्राणीदेखील आरईएम झोप अनुभवतात, असा निष्कर्ष काढला. प्राण्यांचा मेंदू वेगवेगळा असतो. कोआला हा प्राणी २४ तासांपैकी २० तास झोपतो. डॉल्फिन डोळे उघडे ठेवून झोपतो. याचा अर्थ त्याच्या मेंदूचे काम सुरू असते.
या पार्श्वभूमीवर सर्व प्राण्यांमध्ये झोपेचा आरईएम पॅटर्न असतो असं म्हणता येणार नाही. संशोधकांनी झेब्रा फिंचच्या मेंदूच्या हालचालींचा अभ्यास केला. त्यावेळी झेब्रा असं काहीतरी स्वप्न पाहत आहे, ज्यामुळे तो आनंदी आहे. ते एखाद्या नवीन ठिकाणी पोहोचले आहेत किंवा एखादी नवीन गोष्टी शोधली आहे, असं त्यांना स्वप्नात दिसत असावं, हे या अभ्यासाच्या निष्कर्षातून समोर आले आहे.
Check Also
दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती
जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …
पांचजन्य वृत्तपत्र