लेख-समिक्षण

डेन्टल हायजिनिस्ट बनायंय?

बदलत्या जीवनशैलीमुळे दातांच्या व्याधींचे प्रमाण अलीकडे चांगलेच वाढू लागले आहे. त्यामुळे दातांची देखभाल करणार्‍या दंतवैद्यकांबरोबर (डेन्टिस्ट) डेन्टल हायजिनिस्ट या पदाचीही गरज निर्माण होऊ लागली आहे. दंतवैद्यक हा दातांच्या आरोग्याची निगराणी करण्याचे काम करतो. आपल्या दातांमध्ये निर्माण झालेले दोष दूर करण्यासाठी आवश्यकता असेल तर दंतवैद्यक रूग्णावर शस्त्रक्रियाही करतो. अशा दंतवैद्यकाला मदतीकरीता डेन्टल हायजिनिस्टची जरूरी असते. करिअरसाठी या डेन्टल हायजिनिस्ट या पदाचा आपण विचार केला पाहिजे.
क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यासनुसार आंतरराष्ट्रीय स्तारावर येत्या काही वर्षांत नोकरीच्या सर्वाधिक संधी डेन्टल हायजिनिस्ट या क्षेत्रात निर्माण होणार आहेत. डेन्टल हायजिनिस्टला डेन्टीसला मदत करण्याचे काम करावे लागते. डेन्टीसला मदत करताना दातांची सफाई करणे, त्याचे एक्स-रे घेणे, तसेच उपकरणे स्टरलाईज करणे, डेन्टल क्लिनिंग, स्केलिंग, पॉलिशिंग आणि डेन्टल इम्प्रेशन अशी कामे डेन्टल हायजिनिस्टला करावी लागतात.
डेन्टल हायजिनिस्ट हा रूग्णाची मेडिकल हिस्ट्री तपासतो तसेच रक्तदाब आणि अन्य गोष्टींचीही तपासणी करतो. या क्षेत्रात उज्ज्वल करिअर आहे याचे कारण आजकाल जवळपास प्रत्येक व्यक्तीला दातांच्या समस्यांनी त्रस्त केल्याचे दिसते आहे. आपल्या दातांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. दातांचे आरोग्य निट न राखल्यामुळे दात, दाढा किडतात. या किडलेल्या दाढा काढून त्या ठिकाणी दुसर्‍या दाढा बसवणे, तसेच रूट कॅनलसारख्या शस्त्रक्रिया करून दातांचे आरोग्य कायम राखण्याचे प्रयत्न करणे अशी कामे दंतवैद्यकाला कारावी लागतात. अनेकजण आपल्या जीवनशैलीबाबत जागरूक नसतात. त्यांच्या बिनधास्त जीवनशैलीमुळे दातांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असतात. दातदुखी चालू झाल्यावर किंवा दाढ दुखी चालू झाल्यावर अनेकजण दंतवैद्यकाचा रस्ता धरतात. जेव्हा दुखणे हाताबाहेर जाते त्यावेळी डेन्टीसचा सल्ला घेण्याशिवाय आपल्या पुढे पर्याय नसोत. त्यामुळेच हल्ली दंतवैद्यक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्‍या तरूणांचे प्रमाण वाढले आहे.
डेन्टल हायजिनिस्टला डेन्टिस्टला मदत करण्याबरोबरच अनेक कामेही कारावी लागतात. मुख्य म्हणजे रूग्णाबरोबर संवाद साधून त्याला दाढ काढताना वा अन्य शस्त्रक्रिया करताना वेदना जाणवणार नाहीत याची दक्षता डेन्टल हायजिनिस्टला घ्यावी लागते. डेन्टल हायजिनिस्टला शास्त्रीय ज्ञानाबरोबर आर्टिस्टिक अ‍ॅप्रोच असणेही गरजेचे आहे. डेन्टल हायजिनिस्ट हा डेन्टिस्टबरोबर रूग्णालाही मदत करत असतो.
डेन्टल हायजिनिस्ट या पदावर काम करण्याकरीता अनेक रूग्णालयांबरोबरच खासगी डॉक्टरांबरोबरही काम करता येते. त्याचबरोबर नर्सिंग होम, रिसर्च डिपार्टमेंट, औषध कंपन्या येथेही डेन्टल हायजिनिस्टला काम करण्याची संधी आहे. तसेच दातांच्या आरोग्यासंबंधी काम करणार्‍या वेगवेगळ्या संस्थांमध्येही नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. नोकरी करायची नसेल तर कॉस्मॅटिक डेन्टिस बनून आपण स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकतो. डेन्टल कौन्सिलिंग ऑफ इंडिया, नवी दिल्ली याच्याशी संबंधित काही महाविद्यालयात डेन्टल हायजिनिस्टचा अभ्यासक्रम शिकवला जातो.

Check Also

लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत

लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …