लेख-समिक्षण

कृषी रागिणीची यशोगाथा

हरियाणातील महमूदपूर गावातील सरला देवी यांनी आपल्या पतीच्या उपचारांसाठी औषधी उत्पादनांचा शोध घेतला आणि त्यातूनच त्यांनी स्थानिक महिलांना व शेतकऱ्यांना शेवग्याच्या उत्पादनांच्या माध्यमातून रोजगाराचे नवे दालन मिळवून दिले. शेवग्याच्या उच्च गुणवत्तेमुळे मिळणाऱ्या फायद्यांची जाणीव झाल्यानंतर त्यांनी शेतीत अनेक प्रयोग केले आणि या प्रयत्नांमुळे त्यांना दिवसेंदिवस नवी ओळख मिळत गेली. औषधी उत्पादनांच्या वाढत्या मागणीचा अभ्यास करून त्यांनी शेवग्याच्या पानांपासून ते शेंगांपर्यंत सर्व घटकांचा वापर करण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर मुळांपासून देठांपर्यंतही विविध आरोग्यदायी पदार्थ तयार करण्याचे काम त्यांनी सुरू केले. त्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करून देतात आणि शेती प्रशिक्षणही देतात.
सरला सांगतात की त्यांचे पती दिल्लीत 11 वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत होते. त्या काळात त्यांना आरोग्यविषयक अनेक समस्या भेडसावत होत्या आणि घरच्या डॉक्टरांकडून मिळणारे उपचार उपयोगी पडत नव्हते. एके दिवशी त्यांच्या एका मित्राने शेवगा (मोरिंगा) वापरण्याचा सल्ला दिला. त्यांनी घरच्या बागेत झाडे लावली आणि त्याचा नियमित वापर केल्यावर पतींच्या पचनसंस्थेशी, हृदयाशी आणि इतर आरोग्यदायी घडामोडींशी निगडित तक्रारी कमी होत गेल्या. हे परिणाम पाहून सरलांनीही 2017 मध्ये शेवग्याची लागवड सुरू केली.
शेवग्याचे अनेक औषधी उपयोग आहेत, ही जाणीव झाल्यावर त्यांनी नोकरी सोडली आणि पूर्णपणे गावात स्थिरावून या उत्पादनावर लक्ष केंद्रित केले. उत्तम दर्जाचे बियाणे उपलब्ध झाल्याने शेवग्याचे प्रभावी औषधी गुण अधिक स्पष्ट झाले. त्याच काळात त्यांनी जमिनीतील सुपीकता वाढवण्यावरही काम केले. जमिनीतील सेंद्रिय घटक वाढवण्यासाठी अनेक लोकांकडून माहिती गोळा केली आणि मोरिंगाच्या पानांपासून तयार होणाऱ्या खातांचा प्रयोग केला. दोन वर्षे हा मल्चिंग आणि जमिनीच्या गुणवत्तेचा अभ्यास करत त्यांनी नवीन पद्धती विकसित केली. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी शेवग्याचे व्यावसायिक उत्पादन सुरू केले आणि त्यात त्यांना उत्तम यश मिळाले. आज त्याांनश देश-विदेशातही यामुळे ओळख मिळाली आहे. त्यांच्या शेवग्याच्या उत्पादनांना अमेरिकेत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये पसंती मिळत आहे.
माणसाने केवळ एक गोष्ट विकसित करण्याचा मनापासून प्रयत्न केला तरी आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो ही बाब वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …