आर्टिफिशियल इंटिलिजन्स हळूहळू भारत आणि जगातील निवडणुकीच्या प्रक्रियेवर परिणाम करत आहे. त्याचा वाढता प्रभाव पाहता एआय शाप की वरदान याभोवती चर्चा फिरत आहे. आजघडीला विविध क्षेत्रात एआयचा वापर वाढलेला असताना निवडणूक प्रक्रिया देखील त्यापासून अपवाद राहिली नाही. या माध्यमातून राजकीय पक्ष, उमेदवार हे मतदारांना आकर्षित करत आहेत आणि त्यांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत एआयचा वापर केला जाईल आणि हे तंत्रज्ञान प्रचार सभांना अधिक आकर्षक करण्याची सुविधा देऊ शकते.
मागचे वर्ष एकार्थाने हायप्रोफाईल निवडणुकीचे वर्ष होते. यात साठ देशांत मतदान पार पडले. साहजिकच भारताचा देखील यात समावेश होता. ही निवडणूक वैशिष्ट्येपूर्ण असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे एआयचा वापर. आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने प्रचार आणि निवडणूक प्रक्रिया पार पाडलेली असताना मागच्या वर्षातील निवडणूक नव्या युगाची नांदीच म्हणावी लागेल. या निवडणुकीत आर्टिफिशियल इंटिलिजन्सने मतदानाची टक्केवारी काढणे, संभाव्य मतदारांचा शोध घेणे, त्यांचे प्रश्न जाणून घेणे, त्यांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक प्रभावी प्रचार राबविणे यासाठी एआयने मोलाची भूमिका बजावली आहे. त्यास एआय निवडणुक वर्ष म्हटले गेले आहे. उदाहरणार्थ, विचारवंत श्नाईनर यांनी म्हटल्याप्रमाणे, “लोकशाही केवळ निकालापुरती मर्यादित नाही तर त्यामागची मानवी प्रक्रियाही महत्त्वाची आहे. ” एआय समर्थकांच्या मते, एआयचा वापर या प्रक्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी आहे, निवडणूक प्रक्रिया बदलण्यासाठी नाही.
यावर्षीच्या अखेरीस बिहारची विधानसभा निवडणूक होत असून या काळात एआय पुन्हा सक्रिय होईल. उत्तर प्रदेश, बिहार ही दोन महत्त्वाचे राज्य असून राजकीय पक्षाचे या राज्याकडे विशेष लक्ष असते. इथे कोणाला विजय मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरचे पक्ष बिहारच्या आगामी निवडणुकीची तयारी करत आहेत. सत्ताधारी जेडीयू पक्ष स्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे तर राजदचे नेते तेजस्वी यादव हे महाआघाडी सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आर्टिफिशियल इंटिलिजन्स हळूहळू भारत आणि जगातील निवडणुकीच्या प्रक्रियेवर परिणाम करत आहे. त्याचा वाढता प्रभाव पाहता एआय शाप की वरदान याभोवती चर्चा फिरत आहे. आजघडीला विविध क्षेत्रात एआयचा वापर वाढलेला असताना निवडणूक प्रक्रिया देखील त्यापासून अपवाद राहिली नाही. या माध्यमातून राजकीय पक्ष, उमेदवार हे मतदारांना आकर्षित करत आहेत आणि त्यांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे याचा दूरदूरपर्यंत संबंध नसणार्या मतदारांसमोर येणारी माहिती खरी किंवा खोटी याची खातरजमा न करता मतदार मात्र त्यावर विश्वास ठेवत आहेत. एआय तंत्रज्ञानात होणार्या प्रगतीबरोबरच जगभरातील निवडणुकीची प्रक्रिया देखील नवनवीन किर्तीमान स्थापन करत आहे. म्हणून त्याच्या वापरावरून गंभीर चर्चा सुरू आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही पक्षाची मोहीम, मतदारांशी संवाद, निवडणूक व्यवस्थापनात कसा बदल घडवून आणत आहे, यावर मंथन सुरू आहे.
सध्या विविध राजकीय पक्ष नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. उदा. मतदारांच्या भावनिक मुद्यांचे विश्लेषण करणे, मतदानाच्या टक्केवारीबाबत भाकित करणे आणि एवढेच नाही तर व्यक्तिगत अभियानाला व्यापक करण्यासाठी एआयचा वापर होत आहे. भारतासाठी २०२४ ची निवडणुक एआयची निवडणूक म्हटले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदारांशी चर्चा करणे आणि त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी एआय प्लॅटफॉर्म ‘नमो’चा प्रभावीपणे वापर करतात. ते अनेक ठिकाणच्या सभेत भाषण देण्यासाठी होलोग्रामचा देखील वापर करतात. हे तंत्रज्ञान मोदींची उपस्थिती नसतानाही त्यांचे विचार अधिकाधिक मतदारांपर्यांत पोचण्यासाठी सक्षम करते.
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत एआयचा वापर केला जाईल आणि हे तंत्रज्ञान प्रचार सभांना अधिक आकर्षक करण्याची सुविधा देऊ शकते. यात जाहीराती, मतदारांच्या विचारांचे विश्लेषण आणि मतदानाच्या टक्केवारीचा अंदाज बांधणे. एआयचे उपकरण प्रचार अभियानाला अधिक कुशल आणि प्रभावी करू शकते. अर्थात यासोबत काही आव्हाने देखील आहेत. एआय मतदारांना उमेदवारांसदर्भात महत्त्वाची माहिती शोधून काढण्यात मदत करते. काहीवेळा चुकीची माहिती देखील व्हायरल करू शकते. म्हणून मतदारांना संदेश आणि कॉलची पडताळणी करताना अडचणी येतात. भारतात २०२४ च्या निवडणुकीत काही राजकीय पक्षांनी एआयचा वापर करून खरा आवाज वाटावा अशी ऑडिओ लिप आणि पाठिंबा देणारे फसवे फुटेज तसेच विडंबनात्मक सामग्री आणि तथ्यापासून दूर असलेला प्रचार साहित्यांची निर्मिती केली. प्रसंगी एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचीच मोहीम असल्याचा भास मतदारांना झाला.
एआय मतदारांशी संवाद वाढविण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करू शकतो. मात्र यात काही आव्हाने देखील आहेत. यादरम्यान एआयच्या मदतीने तयार केलेल्या सामग्रीचे प्रमाण केवळ दोन टक्के होते. अर्थात हे खूपच किरकोळ प्र्रमाण असले तरी त्याचा भर मतदारांपर्यंत पोचणे आणि त्याना यात सामावून घेणे यावर होता. ही बाब निवडणुकीतील एआयची सकारात्मक बाजू सांगणारी आहे. आम्ही केवळ मतदारांना राजकीय प्रक्रियेत जोडण्यासाठी मदत करत आहोत, असे एआय सांगते. सोशल मीडिया आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मव्यतिरिक्त एआय चॅटबॉट मतदारांना व्यक्तिगत रुपातून मतदारांना जोडण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. उमेदवार मतदारांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकतात आणि त्यांच्या समस्यांचे तातडीने निराकारण करू शकतात. शिवाय ते एआयच्या मदतीने आपल्या मोहिमांना अधिक आकर्षक करत जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देऊ शकतात.
राजकीय पक्ष हे मतदारांची पार्श्वभूमी, मतदानाचा इतिहास, अन्य प्रासंगिक कारणांच्या आधारावर व्यक्तिगत संदेश पाठवून मतदारांचे लक्ष वेधून घेऊ शकतात. २०२४ ची निवडणूक भविष्यासाठी एक चाचपणीच्या रुपाने काम करेल. अर्थात या निवडणुकीचे निकाल अंदाजाप्रमाणे धक्कादायक नव्हते मात्र एआयने काही धोके सांगितले. कारण प्रचार मोहिमांतून माहितीचे विद्रुपीकरण करण्यात आले होते आणि अजूनही ते सुरूच आहे. २०२४ निवडणूकसंदर्भातील जागतिक पातळीवरचा धोका सांगणार्या अहवालात एआयकडून चुकीची माहिती पसरविणे, मतदारांची फेरफार, निवडणुक प्रक्रियेवरचा विश्वास कमी होणे यासारख्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला. निवडणूक आयोगाला एआयचा वापर हा निवडणूक व्यवस्थापन, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडणे आणि व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी करता येऊ शकतो. मात्र एआयपासून होणारे फायदे आणि संभाव्य नुकसान पाहता निवडणूक आणि अन्य क्षेत्रातील एआयच्या वापरावर अंकुश बसविणे आवश्यक आहे.
आजची स्थिती पाहता अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. भारतच नाही तर अन्य देशांनी देखील काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये संमेलन आयोजित केले. भारताने देखील यात सहभाग नोंदविला होता. काही दिवसांपूर्वीच इलेट्रॉनिक व आयटी मंत्रालयाने एआय प्रणालीत सर्वंकष नियमांची मागणी करत एआयच्या वापरामुळे होणार्या संभाव्य धोयाची माहिती दिल्ली न्यायालयात सादर केली. नियमांत पारदर्शकता ठेवण्याचे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता उपकरणांची माहिती देण्याचे आवाहन केले. निवडणुकीच्या काळात एआय अनेक प्रकारे उपयुक्त ठरू शकते. उदा. फिस्कलनोट उपकरण धोरणात्मक निर्णय घेण्यात मदत करते. हे उपकरण मतदारांची आवड निवड एकत्र करण्याचे काम करते. याप्रमाणे आयसाईडविथ उपकरण उमेदवारांना त्यांचे आणि मतदारांचे विचार मिळतेजुळते आहेत की नाही, हे सांगण्याचे काम करते. -कल्याणी शंकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र