कलर्स टीव्हीवरील बहुचर्चित शो म्हणून लोकप्रिय असणाऱ्या ‘बिग बॉस 19’चा प्रवास आता सांगतेकडे सुरू झाला आहे. या शोच्या ग्रँड फिनालेबद्दलची उत्सुकता वाढत चालली असून हा सोहळा कधी आणि कुठे पाहता येईल, घरातील स्पर्धकांपैकी कोणाच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकूट चढणार, विजेत्याला किती बक्षिस मिळणार, याबद्दल अनेक तर्कवितर्क सुरू आहेत.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस 19’चा ग्रँड फिनाले येत्या रविवारी 7 डिसेंबर रोजी थेट प्रेक्षकांसाठी प्रसारित होणार आहे. हा एपिसोड जिओ हॉटस्टार आणि कलर्स टीव्हीदोन्ही प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी दाखवण्यात येणार आहे. दररोजचे भाग जिओ हॉटस्टारवर रात्री नऊ वाजता आणि कलर्सवर साडेदहा वाजता येतात, मात्र फिनालेचा विशेष भाग एकाच वेळेत दोन्हीकडे प्रसारित होणार आहे. आपला आवडता स्पर्धक विजेता ठरणार का, हे पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली असून सोशल मीडियावर मतदानाची चुरस स्पष्टपणे दिसत आहे.
दरम्यान, या सिझनच्या प्राईज मनीबद्दलही चर्चांना उधाण आले आहे. उपलब्ध अहवालांनुसार, ‘बिग बॉस 19’च्या विजेत्याला 50 लाख रुपये मिळणार आहेत. ‘बिग बॉस 18’मध्येही एवढीच रक्कम देण्यात आली होती. मात्र, यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धकांच्या साप्ताहिक मानधनात वाढ झाल्याची चर्चा आहे. अर्थात याचे सर्व तपशील अधिकृतरीत्या जाहीर झालेले नाहीत. प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेले अमाल मलिकसारखे काही कलाकार टॉप-2 मध्ये येतील का हे पाहणे रंजक ठरणार आहे. फिनालेचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतसा याबाबतचा सस्पेन्स अधिकच रंगत जात आहे.- स्वाती देसाई
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र