नवाच्या कल्पनाशक्तीने विज्ञानाला नेहमीच दिशा दिली आहे. शतकानुशतकं माणूस जमिनीवरून आकाशाकडे पाहत राहिला आणि त्या आकाशात झेप घेण्याचं स्वप्न पाहत राहिला. हेच स्वप्न प्रथम विमानांच्या रूपाने साकारले, आणि आता त्याच स्वप्नाचा पुढचा टप्पा म्हणजे ‘उडणारी कार’ किंवा ‘फ्लायिंग कार’. विज्ञानकथांमध्ये, चित्रपटांत आणि कल्पनारम्य कथांमध्ये आपण अशा कार पाहिल्या होत्या; पण आता त्या कल्पना प्रत्यक्ष वास्तवात उतरू लागल्या आहेत. आगामी काळात आपल्या शहरांवरून फ्लाइंग कार उडताना दिसल्यास आश्चर्य वाटू नये. अनेक परकी कंपन्यांकडून फ्लाईंग मोटारीबाबत चाचपणी केली जात आहे. आपल्याकडे देखील यासंदर्भात जोरात तयारी सुरू आहे. भविष्यात फ्लाईंग कारचा प्रयोग यशस्वी ठरला तर प्रवाशांचा नवा प्रवास अनोखा आणि वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे, यात तिळमात्र शंका नाही.
उडणारी कार म्हणजे काय, हा प्रश्न सामान्यतः सर्वप्रथम मनात येतो. साध्या भाषेत सांगायचे झाले, तर ही अशी कार आहे जी जमिनीवर चालू शकते आणि आवश्यकतेनुसार आकाशात उड्डाण करू शकते. म्हणजेच ती एकाच वेळी विमान आणि कार या दोन्हींचे गुणधर्म बाळगणारी यंत्रणा आहे. तिला ‘व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग’ (व्हीटीओएल) क्षमता असते. म्हणजे ती धावपट्टीशिवाय थेट वर उड्डाण करू शकते आणि थेट जमिनीवर उतरू शकते. अर्थात त्याचा वापर अजून सुरू झालेला नाही. या मोटारी सध्या प्रायोगिक तत्त्वावर , चाचणीच्या पातळीवर आणि नियामक संस्थेची मंजुरी, टेस्ट फ्लाईटच्या टप्प्यातून जात आहेत. मात्र आगामी काळात चीन, जपान, अमेरिका आणि युरोपातीलदेशांच्या आकाशात या मोटारींची भाऊगर्दी झालेली दिसेल.
अनेक पातळीवर तयारी
२०२६ पर्यंत जगभरातील अनेक कंपन्या इलेट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ अँड लॅडिंग (व्हीटीओएल) श्रेणीतील मोटार तयार करतील, असा अंदाज आहे. कारण या कंपन्यांच्या फ्लाइंग मोटारींची प्रगती महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. काही देश आणि कंपन्यांनी नव्या श्रेणीतील मोटारींची यादी सोशल मीडियावर जारी केली आहे. सध्या जगभरातील वेगवेगळ्या देशांतील सुमारे अडीचशे कंपन्या फ्लाइंग टॅसी किंवा व्हीटीओएल प्रकल्पावर काम करत आहेत. काही प्रायोगिक तत्त्वावरच्या मोटारी हवेत उड्डाण करत आहेत, तर काही मानवी पायलटसह किंवा काही ठिकाणी अनमॅन्ड तंत्रावर उड्डाणे करत आहेत. उदा. तुर्कियेत सिजेरी याची प्रायोगिक मोटार आणि जपानमध्ये स्काय डाव्हइच्या प्रायोगिक मोटारीने हवेत उड्डाण केल्याची नोंद झाली आहे. अनेक कंपन्यांनी एअर टॅसी सुरू करण्याची व्यावहारिक योजना आखली आहे तर काही देशांनी सर्टिफिकेशनची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. सांगण्याचा अर्थ जमीन, हवा या दोन्ही ठिकाणी दिसणार्या मोटारी सध्या सर्वसामान्यांच्या गॅरेजमध्ये नसल्या तरी संपूर्ण जगभरात त्यावर प्रचंड काम केले जात असून त्याचीच चर्चा सुरू आहे. या श्रेणीतील मोटारींचे उज्ज्वल भवितव्य पाहता जगभरातील मोठे उद्योगपती या श्रेणीतील वाहनांत गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत.
अनेक कंपन्या सक्रिय
आजघडीला विकसित देशांतील अनेक कंपन्या रस्त्यावर धावणार्या आणि आकाशात उडणार्या मोटारीची निर्मिती करण्यास उत्सुक आहेत. अमेरिकेतील जॉबी एव्हिएशनने ‘एफएए’कडून एअर करियर प्रमाणपत्र मिळवले आहे आणि डेल्टा एअरलाइन्ससमवेत भागिदारी केली आहे. याप्रमाणे आर्चर एव्हिशनने देखील युनायटेड एअरलाइन्सकडून दहा दशलक्ष डॉलरची ऑर्डर मिळवली आहे. जेस्ट नावाची एक व्यतिगत पातळीवर उडविण्यात येणारी मोटार देखील अमेरिकेत विकसित होत असून त्याची किंमत १ लाख २८ हजार डॉलर आहे. या मोटारीसाठी चालकाची गरज नाही. त्याचवेळी चीनची एसपेंग एरोहॉट ही अनमॅन्ड फ्लाइंग मोटार ही नियामक संस्थेकडून प्रमाणपत्र मिळवणारी ही पहिली कंपनी ठरली आहे. या कंपनीने लँड एअरक्राफ्ट करियर नावाची मॉड्युलर कार विकसित केली असून त्यात एक फोल्डेबल ‘इव्हीटोओएल’ आहे. टीकॅब टॅग कंपनीने इ-२० नावाची मानवयुक्त इव्हीटोएल विकसित केली आहे. याप्रमाणे ब्राझीलच्या इव्ह एअर मोबिलिटी, जपानची स्काय ड्राइव्ह आणि जर्मनची लिलीयम बोलोकॉप्टर कंपनीने देखील उड्डाण करणार्या मोटारींचा विकास सुरू केला आणि या मोटारी आकाशात आणि जमीनीवर चालण्यासाठी सज्ज केले जात असताना त्याची चाचणी आणि अपग्रेडेशन प्रक्रिया केली जात आहे. सद्यस्थितीत काल्पनिक वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी विकसित देशांतील डझनभर मोटारी हवेत उडण्याचा सराव करत असून सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास त्या ट्रेंड केल्या जात आहेत.
केवळ परदेशातच नाही तर भारतात देखील ईव्हीटॉल विकसित करण्यासाठी काही कंपन्या सक्रिय आहेत. ‘डीजीसीए’ने पंजाबच्या एका कंपनीला एअरटॅसी मॉडेलच्या रचनेला परवानगी देखील दिली. टेकऑफ आणि लॅडिंगसाठी वर्टिपोर्ट तयार करण्याच्या योजनेवर देखील काम केले जात आहे. बंगळूरच्या एका कंपनीमध्ये यादृष्टीने काम केले जात आहे. सर्वकाही ठरल्याप्रमाणे झाले तर २०२८ पर्यंत दिल्ल्ली एनसीआरमध्ये एअरटॅसीची सेवा सुरू होऊ शकते. त्यानंतर कोलकता, मुंबई सारख्या मेट्रो शहरात एअरटॅसी सुरू होण्याची शयता आहे. -महेश शिपेकर, वाहनउद्योगाचे अभ्यासक
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र