लेख-समिक्षण

अमर तार्‍यांच्या ऊर्जेचे रहस्य

आपली सौरमालिका ज्या आकाशगंगेचा एक भाग आहे तिला ‘मिल्की वे’ असे नाव आहे. या आकाशगंगेच्या केंद्रभागी तार्यांचा एक विशिष्ट समूह आहे. या तार्यांना मिळणार्या ऊर्जेचा स्रोत अंतहीन असल्याने हे तारे जणू काही ‘अमर’च बनलेले आहेत. त्यांना ही ऊर्जा ‘डार्क मॅटर’मुळे मिळत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. हे तारे सातत्याने डार्क मॅटरचे कण पकडून ते नष्ट करीत आहेत व या क्रियेतूनच त्यांना ऊर्जा मिळत आहे, असे एका नव्या संशोधनातून दिसून आले.
संशोधकांनी या अभ्यासासाठी कॉम्प्युटर सिम्युलेशन्सचा वापर केला. त्यांना आढळले की या तार्यांच्या गुरुत्वार्षणाने डार्क मॅटरचे जे कण पकडलेले असतात ते तार्यामध्ये वारंवार एकमेकांना धडकतात व त्यांचे रुपांतर सामान्य कणामध्ये होते. या प्रक्रियेत ते लक्षणीय प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करतात. ऊर्जेचा हा अतिरिक्त स्रोत संबंधित तार्याची स्थिरता टिकवून ठेवण्यास मदत करतो. एखाद्या तार्याचा नियमित आण्विक इंधनाचा पुरवठा संपला की त्याचा मृत्यू होतो. मात्र, असा अतिरिक्त पुरवठा होत असल्याने हे तारे जणू काही अमरच बनत आहेत. स्टॉकहोम युनिव्हर्सिटीतील इसाबेल जॉन यांनी याबाबतची माहिती दिली. प्रत्येक आकाशगंगेच्या केंद्रस्थानी एक शक्तिशाली कृष्णविवर असते. ‘मिल्की वे’च्या केंद्रभागीही असेच एक शक्तिशाली कृष्णविवर आहे. त्याच्या जवळच असा तार्यांचा समूह आहे.

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …