बहुलोकप्रिय ठरलेल्या ‘बॉर्डर’ सिनेमाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉर्डर २ नावाने प्रदर्शित होणार्या या बहुप्रतिक्षित सिनेमाविषयी एक नवीन अपडेट समोर आली आहे. सनी देओल अभिनीत या आगामी सिनेमात वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ हे कलाकार काम करणार आहेत हे अगोदरच स्पष्ट करण्यात आले होते. आता या सिनेमात आणखी एका कलाकाराची एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अन्या सिंग या सिनेमाचा भाग होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अन्या या सिनेमात अहान शेट्टीसोबत झळकेल अशी माहिती आहे. अन्याने २०१७ मध्ये ‘कैदी बँड’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने अनेक सिनेमे आणि वेबसिरीजमध्ये काम केलेे.
आर्यन खान दिग्दर्शित ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड‘ या वेबसिरीजमध्ये तिचे कौतुक करण्यात आले. हा सिनेमा २२ जानेवारी २०२६ रोजी थिएटर मध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे चित्रीकरण जवळपास पूर्ण झाले असून, काही सीन्स चित्रित करण्याचे बाकी आहेत. – राकेश माने
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र