शॉर्टचे फिटिंग असा विचार केला तर चार प्रकारात या पँट मिळतात. रेग्युलर, स्लीम, स्ट्रेच आणि लूझ असे हे चार प्रकार आहे. सर्फ शॉर्टस या नेहमीच लूझ फिटिंग असतात. तर सायकलिंग करताना वापरल्या जाणार्या शॉर्टस पायाला घट्ट बसणार्या असतात. स्लीम किंवा रेग्युलर फिटींगच्या कॅज्युअल शॉर्टस बर्याचदा वापरल्या जातात. बर्याचदा योग्य मापाची शॉर्टस खरेदी कऱणे जमतेच असे नाही त्यामुळे बॅगी स्टाईलच्या पँटस वापरू नका. शॉर्टस ची स्टाईल योग्य रीतीने वापरत आली पाहिजे. खूप कमी उंचीच्या पँटस वापरू नका. ती स्टाईल फॅशनमध्ये नाही. शॉर्टस या गुडघ्याच्या वरपर्यंतच्या उंचीच्या असतात. आणि फीट असतात. शॉर्टस म्हणजे फूलपँटचे छोटे रूप. साहित्यात जशी कथा असते तशी लघुकथा असते. शॉर्ट ही पँटचे लघुरूप म्हणू. पण ती फार कमी किंवा जास्त उंचीची नसावी. गुडघ्यापर्यंतची उंची आणि योग्य फीटींग हे तिचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. शॉर्टस घालताना काही नियम बाळगले पाहिजेत.
ह्णइलॅस्टिक असलेल्या पॅटस टाळाच : या शॉर्टस लहान मुलांकरिता चांगल्या दिसतात. तरूणांना इलॅस्टिक असलेल्या शॉर्टस परिधान करणे फॅशन मध्ये बसत नाही. आपण आता लहान मूल नाही हे लक्षात घेऊन अशा शॉर्टस घालणे टाळा. मुख्यतः जेव्हा आपले पोट जरा स्थूलतेकडे झुकलेले असते तेव्हा या शॉर्टस आपल्या पोटाचे टायर दिसू देतो. पट्टा लावता येणार्या किंवा फ्लॅट फ्रंट असणार्या शॉर्टस घ्या. त्यामुळे तुमची ढेरी दिसणार नाही.
ह्ण जॅकेट आणि शर्टस : शॉर्टवर जॅकेट आणि शर्ट घालायची फॅशन आहेच. एखादा बिझीनेस शर्ट घालून त्यावर ब्लेझर घातल्यास आपली वेगळी स्टाईल निर्माण होऊ शकते. हा जरा फॅशन फॉरवर्ड लूक आपण ट्राय करून पाहू शकतो.
ह्ण लिनन शर्ट : लिननच्या शॉर्ट पेक्षा पँटस जास्त पसंतीस उतरल्या आहेत. पण लिनन शॉर्ट खूप आरामदायी आणि हलक्या असतात. लिनन शर्टबरोबर त्या घालू शकता. लिननच्या कापडाला फार जास्त सुरकुत्या पडतात. पण त्याही आता स्टाईलचा भाग झाल्या आहेत. त्यामुळे सुरकुत्या तशाच राहू देत.
ह्ण चिनो शर्ट वापरून पहा : चिनो हे सुती कापडापासून तयार होणारे कापड आहे. बर्याचदा औपचारीक वापरात येणारे शर्ट यापासून बनलेले असतात. या कापडाच्या शॉर्टला मागे आणि बाजूला खिसे असतात.त्यांची उंची गुडघ्याच्या थोडी खालीपर्यंत येते.कोणत्याही प्रकारच्या शर्टाबरोबर ही शॉर्ट आपण वापरू शकतो. सामाजिक किंवा औपचारिक कार्यक्रमातसुद्धा आपण ती वापरू शकतो.
ह्ण शॉर्ट बरोबर काय घालाल : बर्याचदा आपण शॉर्ट घातल्यानंतर त्यावर सॅडल घालतो पण अगदी अनौपचारीक प्रसंगातच सँडल घालणे योग्य दिसते. नाहीतर बोट शूज किंवा मोकासिन, पेनी लोफर्स हे शूजचे प्रकारच घालावे. सॉक्स घालताना सुद्धा पावलापर्यंतचेच घालावेत. मोठे सॉक्स घालायचे असल्यास कॅनव्हासचे स्नीकर्स किंवा स्लीप ऑन शूज घालावेत.
ह्ण शॉर्ट वर पोलो शर्टही आपण घालू शकतो. त्यात अनेक ब्रांड आहेत. रंग आहेत ते सहजपणे पँटशी मॅच होऊ शकतात. त्यामुळे अधिक स्मार्टर लूक मिळू शकेल.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र