राजस्थानमध्ये गौना परंपरेनंतरच लहान वयात लग्न झालेली वधू सासरी संसार थाटण्यासाठी जाते. ही त्या जोडप्यांसाठी आयुष्याची नवी सुरुवात असली, तरीही मुलींच्या मनात असणार्या स्वप्नांचा शेवट असतो. मात्र, रुपा यादवच्या बाबतीत ही परिस्थिती वेगळी होती. रुपाने तिच्या कुटुंबीयांच्या, खास करून तिच्या मेव्हण्याच्या पाठिंब्याने आपले शिक्षण पूर्ण केले. घरच्यांचा पाठिंबा असला तरीही रुपाला आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी आल्या होत्या. आर्थिक समस्या डोक्यावर असताना, समाज आणि त्यांच्या विचित्र नजरांचादेखील रुपाला आणि तिच्या कुटुंबीयांना सामना करावा लागत होता.
आपले शिक्षण पूर्ण करत असताना रुपाने मातृत्वाचादेखील स्वीकार केला होता. कष्टदायी आणि अत्यंत त्रासदायक गरोदरपणात तिने आपले शिक्षण सुरू ठेवले होते. इतक्या गंभीर समस्यांचादेखील रुपाने हसून सामना केला. कोणतीही गोष्ट तिला तिच्या स्वप्नपूर्तीपासून रोखू शकणार नव्हती, याची प्रचिती नीट परीक्षेत आली.
रुपा यादवने 2017 साली नीट राष्ट्रीय पात्रता / प्रवेश परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली होती. केवळ दुसर्या प्रयत्नात तिने हे यश प्राप्त केले होते. रुपाने, तिच्या दहावी आणि बारावीच्या वर्गात तब्ब्ल 84 टक्के इतके गुण प्राप्त केले होते. त्यानंतर रुपाने बीएससीसाठी प्रवेश घेतला. या जोडीने रुपाने एआयपीएमटी या स्पर्धा परीक्षेत भाग घेतला. या परीक्षेत तिला अखिल भारतीय 23000 क्रमांक मिळाला होता. मला एका चांगल्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यात जरी यश मिळाले नसले, तरीही नीटमध्ये मिळवलेल्या उत्तम गुणांमुळे माझ्या पती आणि मेहुण्यानी मला कोटामध्ये एमबीबीएसच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी जाण्यास प्रोत्साहन दिले, असे रुपा सांगते. तिसरीत शिकणारी रुपा आणि तिची बहीण रुक्मा यांचे लग्न अनुक्रमे, 12 वर्षांच्या शंकरलाल आणि त्याच्या मोठ्या भावाशी लावून देण्यात आले होते. रुपाचा मेहुणा आणि तिचा नवरा हे दोघेही शेती करत असे. शेती करत त्यांनी रुपाला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले; वेळ पडेल तेव्हा शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी रिक्षा चालवली. गावकर्यांच्या टोमण्यांना, वाईटसाईट बोलण्याकडे लक्ष न देता हे सर्व त्यांनी केले. नवरा, मेहुणा, कुटुंबाच्या उत्तम साथीने आणि अर्थात स्वतःच्या महेनतीने आज रुपा यादव ही एक यशस्वी डॉक्टर बनली आहे.
आपल्या प्रयत्नाला कुटुंबाजी जर भक्कम साथ मिळाली तर स्वप्न पूर्ण होणे सहज शक्य होते, ही बाब वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?
Check Also
दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती
जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …
पांचजन्य वृत्तपत्र