व्हॅलेंटाईन डेला मिळालेले गुलाब असोत किंवा पूजेनंतर उरलेली फुले, ती फेकून देण्याऐवजी त्यांचा वापर त्वचेच्या सौंदर्यासाठी करणे अधिक फायदेशीर ठरते. बाजारातून विकत आणलेल्या उत्पादनांपेक्षा घरच्या घरी तयार केलेले गुलाब जल फेस पॅक किंवा टोनर म्हणून वापरण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. हे गुलाब जल बनवण्यासाठी प्रथम एक कढई गॅसवर ठेवून तिच्या मध्यभागी एक छोटी रिकामी वाटी ठेवावी. गुलाबाच्या पाकळ्या देठापासून वेगळ्या करून त्या वाटीच्या भोवती कढईत पसरवून टाकाव्यात. त्यानंतर या पाकळ्यांवर एक ग्लास पाणी ओतावे, मात्र मधली वाटी रिकामीच राहील याची काळजी घ्यावी. कढईवर एक घट्ट स्टीलची प्लेट किंवा झाकण ठेवावे जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही आणि या झाकणावर भरपूर बर्फाचे खडे ठेवावेत. गॅसची फ्लेम मंद आचेवर सुरू केल्यावर खालून मिळणारी उष्णता आणि वरून बर्फामुळे मिळणारा थंडावा यामुळे पाकळ्यांमधील अर्काची वाफ मधल्या वाटीत जमा होऊ लागते. झाकणावरील बर्फ पूर्णपणे वितळल्यानंतर गॅस बंद करावा. वाटीत जमा झालेले हे पाणी म्हणजेच तुमचे शुद्ध ’गुलाब जल’ होय. हे पाणी थंड झाल्यावर एका स्प्रे बाटलीत भरून तुम्ही साधारण दोन महिन्यांपर्यंत वापरू शकता.
Check Also
कारकिर्दीच्या उत्कर्षात नवसंशोधनाचं महत्त्व
आधुनिक व्यावसायिक जगताचा वेग प्रचंड आहे. तंत्रज्ञानातील सातत्यपूर्ण बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि वाढती …
पांचजन्य वृत्तपत्र