‘एखाद दिवशी माझे ट्विटर खाते आणि व्हॉटस् अॅप खाते उघडून दाखविन. मला दोन्ही देशातले नागरिक शिव्याशाप देतात. मी काही कृतघ्न मनुष्य नाही. त्यामुळे तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल की, काही जणांना माझे बोलणे आवडते. ते कौतुक करतात. आत्मविश्वास वाढवतात. पण हेसुध्दा तितकेच खरे की दोन्ही बाजुचे कट्टर नागरिक मला शिव्या देतात. आणि खरे तर हे योग्यच आहे. आता या पैकी कुठल्या एकाने शिव्या देणे बंद केले तर माझ्यासाठी तो चिंतेचा विषय असेल,’ असे ख्यातनाम गीतकार जावेद अख्तर यांनी सांगितले.
मुंबईत एका पुस्तकाच्या विमोचनाच्या कार्यक्रमात बोलताना जावेद अख्तर पुढे म्हणाले की, ‘एकीकडे अनेकजण मला काफिर ठरवतात आणि मला नर्कात जावे लागेल असे म्हणतात. दुसरीकडे काहीजण मला जिहादी ठरवून पाकिस्तानात जा असे म्हणतात. मला पाकिस्तान किंवा नर्कापैकी एकाची निवड करावी लागली तर मी नक्कीच नर्काची निवड करीन.’ जावेद अख्तर नेहमीच परखड बोलत असतात. याही वेळेस त्यांनी राजकीय पक्षांना सुनावण्यास मागेपुढे पाहिले नाही. ते म्हणाले की, ‘सर्व पक्ष लोकांसाठी आहे परंतु तरीही कुठलाही पक्ष पूर्ण लोकांचा पक्ष नाही. त्यामुळे नागरिक एका पक्षाची बाजू उचलून धरेल तर दुसरा नाराज होणे सहाजिकच आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांना काय वाटते हे बोलण्याचा अधिकार असायला हवा’. – सुचित्रा दिवाकर
Check Also
रुपेरी पडद्यावरची विद्यार्थी आंदोलने
भारतीय लोकशाहीची खरी ताकद केवळ निवडणुकांमध्ये नाही, तर मतभिन्नता स्वीकारण्याच्या आणि शांततापूर्ण विरोधाला स्थान देण्याच्या …
पांचजन्य वृत्तपत्र