कोण म्हणतं स्वप्नं खरी होत नाहीत? मनापासून ठरवलं, तर प्रत्येक स्वप्न वास्तवात उतरू शकतं. विचार करा तुम्ही एखादं असं काम करता आहात ज्यासाठी तुम्ही महिनोन्महिने मेहनत करता, तहान-भूक हरपून काम करता, आयुष्याचं सगळं लक्ष त्यावर केंद्रित करता पण ४७ वेळा अपयश येते; अशा वेळी कुणीही गतप्राण होऊन जाऊ शकतो. पण युको शिमिजु यांनी अशा परिस्थितीतही हार न मानता आपली संकल्पना पुढे नेली आणि त्या जोरावर आज अब्जावधींची उलाढाल असणारी कंपनी उभी राहिली. युको शिमिजु या एक जपानी डिझायनर होत्या. त्यांनी हॅलो किट्टी हा प्रसिद्ध डिझाईन तयार केले. सुरुवातीला लोक म्हणायचे हे डिझाइन खूपच साधे आहे, यात काही वेगळं नाही. युकोच्या या डिझाइनला तब्बल ४७ वेळा नाकारण्यात आलं. तरीसुद्धा त्यांनी हार मानली नाही. आपल्या स्वप्नावर विश्वास ठेवला आणि प्रयत्न सुरू ठेवले. शेवटी त्यांची मेहनत फळाला आली.
१९७४ मध्ये झाला जन्म एका आयकॉनचा : आज हॅलो किट्टी एका साध्या स्केचपासून ८० अब्ज डॉलर्सच्या जागतिक साम्राज्यात परिवर्तित झाली आहे. खेळणी, कपडे, एअरलाईन्स, थीम पार्स सर्वत्र तिची छाप आहे. ही कहाणी १९७४ मध्ये सुरू झाली. त्यावेळी युको शिमिजु जपानमधील सॅनरिओ या कंपनीत काम करत होत्या. एका दुपारी लंच ब्रेकमध्ये त्यांनी कागदावर एक गोंडस मांजरीचं साधं स्केच काढलं. त्या मांजरीच्या चेहर्यावर ना विशेष रंग, ना आकर्षक सजावट फक्त साधी गोड अभिव्यक्ती. सॅनरिओच्या लोकांना वाटलं हे डिझाईन काही चालणार नाही. त्यांनी पुन्हा-पुन्हा ते नाकारलं. पण युकोनं हार मानली नाही. अखेर १९७४ मध्ये हे डिझाईन एका छोट्या कॉईन पर्सवर छापण्यात आलं. ती पर्स बाजारात आली आणि तिला भरपूर मागणी मिळाली. लोकांना ते निरागस मांजर इतकं आवडलं की ही पर्स त्यामुळं लोकप्रिय झाली. हळूहळू हॅलो किट्टी खेळणी, कपडे, शाळेच्या वस्तू, बॅग्स, अगदी विमान कंपन्यांपर्यंत आणि थीम पार्सपर्यंत पोहोचली. आज जगभरातील प्रत्येक वयोगटातील लाखो जण हॅलो किट्टीचे चाहते आहेत. हॅलो किट्टीची खरी जादू तिच्या साधेपणात आहे. तिचं डिझाईन इतकं सोपं, गोड आणि निरागस आहे की कोणत्याही देशातील, कोणत्याही संस्कृतीतील लोक तिला सहज स्वीकारतात. यात शब्दांची गरजच नाही फक्त दोन काळे डोळे आणि एक हसू जगभरातील लोकांना जोडून ठेवतात. आज हॅलो किट्टी ही ८० अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेली कंपनी आहे.
साधेपणातच निरागसता आणि संघर्षात यश दडलेलं असतं ही बाब वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?
Check Also
दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती
जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …
पांचजन्य वृत्तपत्र