लेख-समिक्षण

सौंदर्यासाठी पेप्टाईडस्‌‍चे महत्त्व

दररोज नवनवीन स्किनकेअर घटकांची माहिती आपल्याला मिळत असते. गंमत म्हणजे प्रत्येक घटक त्वचेसाठी लाभदायक असल्याचे सांगितले जाते. यापैकी पेप्टाइडस्‌‍ हे खरोखरच आपल्या त्वचेसाठी आवश्यक आणि उपकारक असतात. काही वेळा या पेप्टाइडस्‌‍सह वापरले जाणारे इतर घटक भ्रामक असू शकतात, पण पेप्टाईडस्‌‍ स्वतः फायदेशीर असतात.
पेप्टाइडस्‌‍ हे लहान प्रथिनांचे संयुग असून ते अमीनो आम्लांपासून बनलेले असतात. अमीनो आम्ल हे प्रथिनांचे मूलभूत घटक मानले जातात. हे शरीरात नैसर्गिकरित्या तयार होतात आणि त्वचेतील कोलेजन निर्मिती वाढवतात. कोलेजनमुळे त्वचा घट्ट होते, सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा तरुण दिसते. वय वाढल्याने कोलेजन निर्मिती कमी होत असल्याने त्वचा सैलसर होते व सुरकुत्या दिसू लागतात. अशा वेळी पेप्टाइडस्‌‍ त्वचेसाठी पोषक ठरतात. थोडक्यात, यामुळे त्वचेला तरुणपणाचा लुक मिळतो.
अँटी-मायक्रोबियल पेप्टाइड्स त्वचेच्या जखमा भरून काढण्यास मदत करतात आणि संक्रमणाशी लढतात. पेप्टाइडसमुळे वाढीचे हार्मोन स्रवले जातात आणि स्नायूंची वाढ किंवा दुरुस्ती होते.
पेप्टाइडस्‌‍ आपल्याला नैसर्गिकरित्या आहारामधून मिळू शकतात. ते प्रथिनांच्या पचन प्रक्रियेमध्ये अमिनो आम्लांतून तयार होतात. दुधातील केसीन आणि व्हे प्रथिने हा पेप्टाईडस्‌‍चा समृद्ध स्रोत मानला जातो. दही, ताक, पनीर यामधून लॅक्टो-पेप्टाइडस्‌‍ तयार होतात आणि ते त्वचेसाठी फायदेशीर असतात.
सोयाबीन, मसूर, राजमा, हरभरा यांमध्ये असणार सोया पेप्टाइडस्‌‍ हे कोलेस्ट्रॉल कमी करणे, त्वचा सुधारणे, आणि हार्मोन संतुलन यामध्ये मदत करतात. बदाम, अक्रोड, शेंगदाणे हे प्रथिनसमृद्ध अन्नघटक पेप्टाइड्सच्या निर्मितीस चालना देतात.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …