लेख-समिक्षण

सर्वात महागडे औषध

जगातील सर्वात महागडं औषध कोणतं, हे माहिती आहे का? कोणत्या आजारावरील उपचारासाठी हे औषध वापरलं जातं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
इंग्लंडमधील एक वर्षाच्या बाळ एडवर्डला एका गुंतागुंतीच्या आजाराने ग्रासले आहे, हे कळाल्यानंतर महागड्या औषधाचा प्रश्न ऐरणीवर आला. त्या बाळाला ‌‘एसएमए‌’ नावाचा आजार झाला. म्हणजेच स्पाइनल मस्क्युलर ॲट्रोफी ने त्याला ग्रासले. स्पाइनल मस्क्युलर ॲट्रोफीने ग्रस्त असलेल्या त्या मुलावर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे औषध जगातील सर्वात महागडे औषध असल्याचे म्हटले जाते. त्या औषधाचे नाव झोलजेन्स्मा ड्रग आहे. हेच औषध एका वर्षाच्या बाळ एडवर्डला दिले जातंय. हे औषध म्हणजे प्रत्यक्षात जीन थेरपी आहे. पण, हा आजार काय आहे? याबद्दल जाणून घेऊया.
‌‘एसएमए‌’ आजारात स्नायूंच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या प्रथिनांची कमतरता असते. या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाची हालचाल थांबते. तो नीट बसू शकत नाही आणि उभाही राहू शकत नाही. अशा रुग्णांच्या उपचारात झोलगेझ्मा औषध हे एक क्रांतिकारी औषध मानले जाते. वैद्यकीय शास्त्राने झोलगेस्माच्या रूपात जीन थेरपीच्या स्वरूपात एक नवीन चमत्कार केला आहे. समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार या औषधाची किंमत 1.79 दशलक्ष पौंड म्हणजेच सुमारे 18 कोटी रुपये आहे.

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …