आजच्या काळात महिला केवळ घर सांभाळत नाहीत, तर आर्थिक निर्णयांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. खरेदी असो, शिक्षणाचा खर्च असो किंवा एखादं स्वप्न पूर्ण करायचं असो महिलांनी आता अर्थकारणावरही नियंत्रण ठेवायला सुरुवात केली आहे. आज अनेक महिला क्रेडिट कार्डचाही वापर करताहेत. हे एक अतिशय उपयोगी साधन आहे. पण, याच्या चुकीच्या वापराने तोटा होण्याचीही शक्यता असते. क्रेडिट कार्डच्या सुयोग्य वापरामध्ये बिलिंग सायकल समजून घेणे ही पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे.
बिलिंग सायकल म्हणजे तुमच्या क्रेडिट कार्डवरील खर्चाची एक ठराविक कालमर्यादा. ही सहसा २७ ते ३१ दिवसांची असते. या काळात तुम्ही केलेले व्यवहार (जसे की शॉपिंग, हॉटेल बुकिंग्स, किंवा ऑनलाइन शॉपिंग) टॅॅ्रक केले जातात आणि त्या सायकलच्या शेवटी बँक एक स्टेटमेंट (बिल) तयार करते. उदाहरणार्थ, जर तुमची बिलिंग सायकल ५ तारखेला सुरू होऊन ४ तारखेला संपत असेल तर या कालावधीतील सर्व खर्चाचा हिशोब ५ तारखेला तुम्हाला स्टेटमेंटच्या रूपात मिळतो.
योग्य बिलिंग सायकल निवडणं का गरजेचं आहे?
तुमचा पगार, फ्रीलान्सिंगमधून मिळणारे मानधन किंवा इतर उत्पन्न महिन्याच्या ठराविक तारखेला येत असेल, तर बिलिंग सायकल त्या तारखेनंतरची ठेवावी. त्यामुळे वेळेवर बिल भरणं सोपं जाईल.
बिलिंग सायकल तुमच्या वेतनाशी जुळवली, तर तुम्ही वेळेवर पैसे भरू शकता आणि उशीराने भरल्यास लागणार्या व्याज आणि दंडापासून वाचू शकता.
वेळेवर बिल भरल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारतो. हा स्कोअर भविष्यात गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा व्यवसायासाठी लोन मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.
बिलिंग सायकल बदलता येते का?
विद्यमान सायकल तुमच्या उत्पन्नाशी जुळत नसल्यास ती बदलता येते. तुमच्या कार्ड इश्यू करणार्या बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क करा. काही मिनिटांतच ते सायकलमध्ये योग्य बदल करू शकतात. काही बँका ही सेवा त्यांच्या मोबाईल अॅप किंवा नेटबँकिंगवरही देतात.
बिलिंग सायकल योग्य निवडली असल्यास घरखर्च आणि कार्ड बिल यांचं संतुलन ठेवायला मदत र्होते. आकस्मिक खर्चाची तयारी ठेवता येते. ‘बाय टुडे, पे लॅटर’ ही संकल्पना अधिक जबाबदारीने वापरता येते क्रेडिट कार्ड हे फक्त खरेदीसाठी नाही, तर आर्थिक नियोजनाचं साधन आहे. फक्त त्याचा वापर अतिशय शिस्तपूवर्क आणि विचारपूर्वक केला पाहिजे. योग्य बिलिंग सायकल ही एक लहानशी गोष्ट वाटत असली, तरी कार्डवापरातील तिचे महत्त्व मोठे आहे.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र