नव्वदच्या दशकातील रुपेरी पडद्यावर गाणे नृत्याचा जलवा असताना, अभिनेत्री सोमी अलीसाठी तो का कठीण होता. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आंदोलन’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान संजय दत्तसोबतचा अनुभव सांगतांना सोमी म्हणते, ‘माझ्याकडे कधीच नृत्याचे औपचारिक प्रशिक्षण नव्हते. भारतातील अनेक कलाकारांना लहानपणापासून नृत्य शिकवले जाते, कारण ते आपल्या संस्कृतीचा भाग आहे. पण माझ्यासाठी तो मोठा कस होता. सरोज खानसारख्या कोरिओग्राफरच माझ्याकडून नृत्य करवून घेऊ शकत होत्या, कारण मी त्यांना घाबरायचे.’
‘दिल तो खोया है यहीं पे कहीं पे’ या गाण्याच्या चित्रीकरणावेी ती खूपच गोंधलेली होती. पण संजय दत्तने तिच्या चेहर्यावरची भीती ओखून हसत सांगितले, ‘चिंता नको करू, मीसुद्धा डान्स चांगला करत नाही. आपण दोघेही यात कमजोर आहोत, म्हणून कुठलीही भिती न ठेवता आनंद घे!’ त्या एका वायाने वातावरण हलके-फुलके झाले सोमी म्हणाली, ‘संजयने मला अमेरिकेतल्या अनुभवांबद्दल गप्पा मारून काही मिनिटांतच शांत केले. तो खूप प्रामाणिक, जमिनीवरचा आणि मनाने मोठा माणूस आहे, अगदी जग्गू दादासारखा.’ – राधिका बिवलकर
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र