भारताच्या शूर जवानांनी दिलेल्या आक्रमक प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानने अखेर गुडघे टेकले आहेत. संघर्षविराम झाला आहे. दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला योग्य तो धडा देऊन भारताने आपले पहिले उद्दिष्ट साध्य केले आहे. पण यादरम्यान एक प्रश्न सतत मनाला अस्वस्थ करतो आहे… तो म्हणजे बैसरन व्हॅलीत ४०० लोकांच्या नजरेसमोर २६ पर्यटक मारले गेले. यामध्ये घोडेवाला सय्यद वगळता एकाही व्यक्तीने प्रतिकार का केला नाही? एकाने जरी प्रतिकार केला असता, तरी काही जण वाचले असते. हे पहलगामला घडलं, उद्या हे कुठेही होऊ शकतं. तेव्हा काय कराल?
प्रशिक्षित मारेकरी पॉईंट ब्लँक रेंजवर गोळी झाडतो, कारण त्याला खात्री हवी असते की सावज लगेच मरावं. पण जर टार्गेट हलत असेल, प्रतिकार करत असेल, तर तो सहसा मरत नाही. कारगिल युद्धात परमवीर चक्र विजेता योगेंद्र सिंग यादव याला २७ गोळ्या लागल्या होत्या, तरी तो जिवंत राहिला.जर तुम्ही पुतळ्यासारखे उभे राहिलात, तर हृदय किंवा डोयावर गोळी लागून तुम्ही मरणारच. पण जर प्रतिकार केला, तर गोळ्या पाय, खांदा, पोट यावर लागतात आणि माणूस वाचतो. म्हणूनच स्वसंरक्षणाचे मूलभूत तंत्र प्रत्येकाने शिकावं.
२२ एप्रिल २०२५ रोजी, पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमध्ये चार जिहादी दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची नृशंस हत्या केली. दहशतवाद्यांनी डोयावर व छातीत गोळ्या झाडत ही कत्तल केली. देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियावर अनेकांनी श्रद्धांजली वाहिली, शोक व्यक्त केला. मी स्वत:ही एका मेसेजमध्ये मृतात्म्यांना आदरांजली वाहिली. पण त्या क्षणी मी स्वत:ला विचारत होतो यातून आपण खरंच काही शिकणार आहोत का?
या हल्ल्याचे स्वरूप अगदी नियोजनबद्ध होते. ५० ते ४०० मीटरच्या अंतरावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दोन दहशतवादी गोळ्या झाडत होते आणि इतर दोन पर्यटकांमध्ये मिसळले होते. त्यांनी घाबरलेल्या लोकांना परत हल्लेखोरांच्या दिशेने वळवलं. मग धर्म विचारून लोकांची निवड केली गेली. कलमा म्हणायला सांगितला गेला. न जमल्यास गोळ्या घातल्या गेल्या. काहींना सुंथा आहे का, हे पाहून निर्णय घेतले गेले. म्हणजे हल्ल्याच्या वेळी धार्मिक कसोटीचा वापर करून निर्दोषांचा बळी घेतला गेला. माझं मन वारंवार एका गोष्टीकडे परतत होतं …आपल्या समाजातील पळपुटी मानसिकता. लोक मृत्यूसमोर उभं ठाकल्यावरही काही करत नाहीत, हे फार चिंताजनक आहे. ‘वेडात दौडले वीर मराठे सात’ असं म्हणणारे आपण, अशा प्रसंगी गप्प का बसतो?
यात एकमेव अपवाद होता घोडेवाला सैयद आदिल हुसैन. तो मुस्लिम असूनही त्याने दहशतवाद्यांशी झटापट करत रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मरण पावला. बाकी ३५० लोकांपैकी कुणीही असे धाडस का दाखवले नाही?
कोणी म्हणेल, तुम्ही सैनिक, हे तुमचं काम आहे. पण आम्हीही जन्मत: सैनिक नव्हतो. आम्ही लढायला शिकलो. फौज हे तुमचं प्रोफेशन नसलं तरी स्वसंरक्षणाकरिता तरी काही पावले उचलता आलीच पाहिजेत. सांप्रत काळात याला पर्याय नाही.
२६ धडधाकट लोक चार दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडतात आणि कुणीही काही करत नाही हे अतर्य नाही का? शांतपणाने विचार करा. एकाने जरी प्रतिकार केला असता, तरी काही जण वाचले असते. हे पहलगामला घडलं, उद्या हे कुठेही होऊ शकते. मॉल, बाजार, शाळा, कॉलेज… मग तेव्हा काय कराल?अशा वेळेस तुम्ही काय करावं, हे शिकणं आवश्यक आहे. आणि ते मनावर ठसवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
काय करायला हवे?
* दहशतवाद्यांसमोर पळपुटं वर्तन करू नका. प्रतिकार करा.
* एखादा दहशतवादी ज्या वेळी सुंथा आहे की नाही तपासत असेल, तेव्हा तो तुमच्याजवळ येतो. तेव्हा त्याच्या रायफलची नळी वळवा, त्याच्या संवेदनशील भागावर (गुप्तांग, डोळे, गळा) हल्ला करा.
* एखादी गोष्ट करण्यास सांगितल्यावर त्याच वेळेस डोळसपणे एखादं पादत्राण त्याच्यावर फेका. क्षुल्लक प्रतिकारही त्याला गोंधळात टाकू शकतो.
* तुम्ही त्याच्यावर ओरडलात, काही तरी फेकलंत, हललात तरी त्याला अचंबित करता येतं. तुम्ही एकटे नसाल, तर त्याच्यावर सामूहिक हल्ला करा. पाय पकडून, रायफल हिसकावून जमेल ते करा.
* हातात आली तर ती तुमच्यापासून दूर झटका, त्यावर कोट / जॅकेट फेकून झाकून टाका.
* स्थिर राहू नका. हालचाल करणं हेच जगण्यासाठी महत्त्वाचं आहे.
* तुमचा मृत्यू ठरलेला असला तरी जगण्याची शयता लढण्यातच आहे.
* हल्ला करणे अशय नाही, फक्त कठीण आहे. प्रयत्न केल्यास तुम्ही वाचू शकता. इतरांना वाचवता आलं, तर तुमचं बलिदान व्यर्थ जाणार नाही.
* या घटनेच्या दरम्यान अनेकांनी फोटो आणि व्हिडिओ काढले पण कोणी मदतीला धावलं नाही. हे अत्यंत लाजिरवाणं आहे. आत्मघातकी जिहादी नव्हते. ते पळू शकले असते. पण कोणी एकजणही पुढे आला नाही.
* छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपण सांगतो, धर्मवीर संभाजी महाराजांचा जयजयकार करतो; पण तसे प्रत्यक्ष वागण्याची आपल्यात धमक नसते, हे खूप दुर्दैवी आहे.
* अखेर एवढंच सांगतो. अशी वेळ कुणावरही, कुठेही, केव्हाही येऊ शकते. अशा वेळी गर्भगळीत न होता, धैर्यानं लढा. मरायचंच असेल तर वाघासारखं मरा. शेळीसारखं नाही. कृपा करून कधीही दहशतवादी लोकांसमोर गुढगे टेकू नका. इतके असहाय्य बनू नका की तो अगदी सहज तुम्हाला मारेल. त्यामुळे त्यांचं मनोबल उंचावेल आणि आपलं गर्तेत जाईल. तो भक्ष्य शोधत असतो. विना लढा देता सहज साध्यपणे त्याच भक्ष्य बनू नका. नेव्हर. शांततेचा दिखावा करत गुढगे टेकू नका. त्याच्या मनात धडकी भरवायला शिका.
* या मानसिकतेचं बिंबवणं आणि सातत्य ठेवणं, हेच आपल्या अस्तित्वाचं खरं शस्त्र आहे. अन्यथा पुन्हा एकदा मेणबत्त्या आणि अश्रूंवरच सारा हिशोब उरेल. दहशतवाद्याला प्रतिरोध करून वाघासारखं मारण्यात बहादुरी आहे, शेळीसारखं डोक खाली घालून मरण्यात नाही.
* बैसरन व्हॅलीत ४०० लोकांच्या नजरेसमोर २६ पर्यटक मारले गेले. कुणीही प्रतिकार केला नाही. ते लोक घाबरले, की त्यांचं मानसिक स्वसंरक्षण शून्य होतं, हे कळत नाही. दहशतवाद्यांनी कुराणातील कलमा म्हणायला लावली, ती म्हणता न आल्यास सरळ गोळी घातली. काहींना सुंथा आहे का ते पाहून मग गोळ्या घातल्या. या नरसंहारात एकाही व्यक्तीने त्यांच्या रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला नाही.
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र