चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते माणसाला एका वेगळ्या जगात घेऊन जाणारे माध्यम आहे. पडद्यावर उमटणार्या भावनांनी आपण अनेकदा वास्तव विसरतो आणि पात्रांच्या आनंद-दुःखात रंगून जातो. काही चित्रपटांचा शेवट जसा आशादायक आणि सुखद असतो, तसाच काहींचा शेवट इतका वेदनादायी असतो की तो मनावर कायमचा ठसा उमटवून जातो. असेच काही बॉलिवूड चित्रपट आहेत, ज्यांच्या कथांचा शेवट शोकांत आहे पण त्यातून उलगडणारे आयुष्याचे वास्तव प्रत्येकाला विचार करायला लावते. त्यामुळेच गोड शेवट पाहण्याची सवय जडलेल्या प्रेक्षकांनाही हे चित्रपट पसंतीस उतरले.- सोनम परब
चित्रपट आणि सिनेमा हे असे अद्भुत माध्यम आहे ज्यात प्रेक्षकांना एका वेगळ्या जगात आणि स्वप्नाळू अवस्थेत नेण्याची विलक्षण ताकद असते. विशेष म्हणजे जेव्हा एखादा चित्रपट आनंदी आणि आशावादी शेवटाकडे पोहोचतो, तेव्हा पार्श्वभूमीवर आपल्या आवडत्या समारोपगीताचे सूर लागतात आणि आपले डोळे आनंदाश्रूंनी भरून येतात. पण आपल्याला सर्वाधिक भिडतात ते असे चित्रपट जे पारंपरिक पद्धतीने संपत नाहीत. त्यांचा शेवट अनेकदा अनपेक्षित, दुःखद आणि मनाला चटका लावणारा असतो; तरीदेखील ते आपल्याला वास्तवाशी जोडणारी एक सुंदर आणि विश्वासार्ह कथा सांगतात.
हिंदी चित्रपट पाहणार्या प्रेक्षकांची मानसिकता अनोखी असते. कोणत्या चित्रपटाची कथा त्यांना आवडेल, याचा कधीच नक्की अंदाज लावता येत नाही. सामान्य धारणा अशी आहे की, मनोरंजनाच्या मूडमध्ये थिएटरमध्ये येणारा प्रेक्षक हसत-खळखळत बाहेर जावा. म्हणजेच त्याला सुखद शेवट पाहायला मिळायला हवा. हीरो-हीरोईनचे मिलन होणे, खलनायक पकडला जाणे, न्यायालयाचा निर्णय नायकाच्या बाजूने होणे आणि कोणत्याही संकटातून हीरो-हीरोइनची सुटका होणे यासारखे शेवट प्रेक्षक अपेक्षित करतात. प्रेक्षक स्वतः ज्या समस्यांशी झुंजत असतात, त्याच्यासारखा शेवट फारसा प्रेक्षकांना रुचत नाही.
तथापि, इतिहासात अनेक कालजयी चित्रपटांचे शेवट दुःखद राहिले आहेत. प्रेमकथा असलेल्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये ‘देवदास’, ‘मुगल-ए-आजम’, ‘प्यासा’ आणि ‘लैला मजनू’ यामध्ये हीरो-हीरोईनचे मिलन होत नाही, त्यामुळे प्रेक्षक दुःखी होतात. त्याचबरोबर, अमिताभ-जया यांचा ‘मिली’ आणि राजेश खन्ना यांचा ‘आनंद’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दुःखद शेवटाचे कारण दुर्मिळ आजार असल्याचे दाखवण्यात आले आहे.
अलीकडील चित्रपट ‘सैयारा’ चा शेवटही असाच दुःखद आहे, तरीही त्याने कमाईचा विक्रम मोडला. ही अधुरी प्रेमकथा असून या कथेचा लायमेस प्रेक्षकांना भावनिकरीत्या उद्विग्न करतो. अशा अनेक चित्रपटांनी प्रेम, जीवनसंघर्ष किंवा न्यायाच्या शोधावर आधारित कथा सांगून प्रेक्षकांची मने हलवली आहेत. ‘देवदास’ (तीनदा), ‘दिल बेचारा’, ‘आशिकी-२’, ‘तेरे नाम’, ‘एक दूजे के लिए’ यांसारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांना दुःखद अनुभव दिला, आणि तरीही ते हिट ठरले. अशा चित्रपटांनी प्रेक्षकांना स्वतःच्या भावना व्यक्त करण्याची संधी दिली, त्यांच्या आयुष्यातील समस्यांना छोटं मानायला शिकवलं. दुःखद शेवट असलेले चित्रपट यशस्वी आणि आठवणीत राहणारे ठरतात.
यथार्थवादी आणि भावनिक दृष्टिकोन प्रेक्षकांना भुरळ घालतो. दुःख, विरह, अपूर्ण प्रेम यांसारख्या भावना प्रत्येक व्यक्ती अनुभवतो. जेव्हा कथा या पैलूंवर आधारित असते, तेव्हा प्रेक्षक स्वतःला त्या कथेत पाहतात. दुःखद शेवट प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा सोडतो, त्यामुळे चित्रपट आणि पात्रे लक्षात राहतात. अशा कथांना अनेकदा ‘लासिक’ मानले जाते.
‘गंगा जमुना’ (१९६१) मध्ये दोन भावांचा संघर्ष, विद्रोह आणि बलिदान यावर आधारित कथा आहे. या चित्रपटाचा शेवट जमुना यांच्या मृत्यूसह येतो. ‘अमर प्रेम’ (१९७२) मध्ये शशि कपूर व शर्मिला टॅगोर यांचे पात्र एकमेकांना मिळत नाहीत. ‘देवदास’ (२००२) मध्ये देवदास पारोच्या प्रेमात बुडून दारूच्या आहारी जातो आणि तिच्या घराबाहेर शेवटचा श्वास घेतो. ‘तेरे नाम’ (२००३) मध्ये सलमान खानचे पात्र राधे मानसिक संतुलन गमावते आणि प्रेमिकेच्या मृत्यूनंतर पूर्णतः कोलमडते. ‘कल हो न हो’, ‘रॉकस्टार’, ‘आशिकी-२’, ‘गोलियों की रासलीला: राम-लीला’, ‘बाजीराव मस्तानी’ यासारख्या चित्रपटांत मध्यभागी आणि शेवटी दुःखद घटक दिसतात.
प्रेमकथांव्यतिरिक्त सामाजिक आणि कौटुंबिक दुःखाचे कथानकही प्रेक्षकांवर परिणाम करतात. अमिताभ-जया भादुरीच्या ‘अभिमान’ (१९७३) मध्ये गायक जोडप्याच्या नात्यातील तुटणार्या संवादामुळे कथा भावनिक होते. ‘मासूम’ (१९८३) मध्ये अवैध संतान स्वीकारल्यामुळे होणार्या कौटुंबिक वेदना दाखवल्या आहेत. ‘बागबान’ मध्ये वृद्ध दांपत्य स्वतःच्या मुलांकडून उपेक्षित होतात. ‘सनम तेरी कसम’, ‘हायवे’, ‘पद्मावत’, ‘इश्कजादे’, ‘मसान’, ‘द लंच बॉस’ यासारख्या चित्रपटांचा दुःखद शेवट प्रेक्षकांना रडायला लावतो. अशा कथांमध्ये प्रेम, हानी, बलिदान आणि मानवी बंधनांचे जटिल चित्रण केले जाते. प्रेक्षक स्वतःच्या जीवनाशी त्यांची तुलना करतात आणि भावनिक अनुभव घेतात.
दुःखद शेवट असलेल्या चित्रपटांमध्ये अपूर्ण प्रेम, विरह, मृत्यू, बलिदान, अकेलापन, अधुरी इच्छा यासारखे घटक वारंवार दिसतात. मुख्य पात्र एकमेकांपासून दूर जातात किंवा प्रेमप्रकरण पूर्ण होत नाही. प्रिय व्यक्तीची हानी, कुटुंब किंवा मित्राचा मृत्यू कथेला दुःखद बनवतात. काही चित्रपटात नायक किंवा प्रमुख पात्र मोठ्या उद्दिष्टासाठी स्वतःचे बलिदान देतो. हे घटक प्रेक्षकांवर गहन भावनिक प्रभाव टाकतात आणि चित्रपट स्मरणीय होतो.
प्रारंभीच्या काही ट्रॅजिक चित्रपटांमध्ये ‘अनारकली’ (१९५३), ‘प्यासा’ (१९५७), ‘सुजाता’ (१९५९), ‘बंदिनी’ (१९६३) यांचा समावेश करावा लागेल. या चित्रपटांमध्ये प्रेम, सामाजिक अडचणी किंवा वैयक्तिक कारणास्तव नायक-नायिकांचे मिलन होत नाही किंवा मृत्यू होतो. हिंदी चित्रपटांमध्ये अशा चित्रपटांनी प्रेक्षकांना भावविभोर केले आणि ट्रॅजेडी हिंदी चित्रपटसृष्टीचा अविभाज्य भाग बनली. ‘देवदास’, ‘अनारकली’, ‘मुगल-ए-आज़म’ यांनी ट्रॅजिक शेवटाचा प्रवाह सुरू केला.
‘गजनी’ या चित्रपटाने देशभर धुमाकूळ घातला होता. सुरुवातीला गोड प्रेमकथा वाटणारी ही कथा गुंडांच्या हल्ल्याने दुःखद वळण घेते आणि नायकाचे आयुष्य उद्ध्वस्त होते. ‘कल हो ना हो’ मध्ये अमन नायनावर प्रेम करतो पण आपल्या मृत्यूची जाणीव असल्याने तिचे भविष्य दुसर्याच्या स्वाधीन करून जातो. या चित्रपटातील प्रत्येक प्रसंग डोळे पाणावणारा आहे. ‘रंग दे बसंती’ हा तरुणाईला प्रेरणा देणारा पण हृदय पिळवटून टाकणारा चित्रपट आहे. मित्रांच्या बलिदानाची कहाणी प्रेक्षकांना अंतर्बाह्य हलवून टाकते. ‘रांझणा’ मध्ये कुंदनचे निःस्वार्थ प्रेम आणि त्याग शेवटच्या क्षणापर्यंत भिडतो. तसेच ‘यों की’, ‘राम-लीला या चित्रपटांनी देखील प्रेम, फसवणूक, वैर आणि नियती यांचे अनोखे दर्शन घडवले. हे सर्व चित्रपट केवळ दुःखद शेवटांमुळे नव्हे, तर त्यांच्या भावनिक सच्चेपणामुळे मनाला भिडतात. ते आपल्याला आठवण करून देतात की जीवन नेहमी परीकथांसारखे नसते; कधी कधी वेदनाच आपल्याला जीवनाचे खरे मोल शिकवतात.
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र