जेष्ठ अभिनेते सौरभ शुक्ला यांची बॉलीवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये केली जाते. त्यांनी आजपर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तसेच बर्याच चित्रपटांमध्ये त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच त्यांनी सलमान खानच्या ‘किक’ चित्रपटातील एक किस्सा शेअर केला आहे.
‘किक’मध्ये सौरभ शुक्ला यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत होते. जॅकलिनच्या वडिलांची भूमिका सौरभ शुल्का यांनी साकारली होती. डिजिटल कॉमेंटरीशी बोलताना सौरभने एका सीनचा संदर्भ देताना सांगितले की, सलमानची व्यक्तिरेखा माझ्या मुलीचा बॉयफ्रेंड म्हणून मला पहिल्यांदाच भेटायला आली आहे. विशेष म्हणजे हा सीन अशा प्रकारे लिहिला आहे की तो मला माझा पगार, माझी बचत इत्यादींबद्दल विचारतो. म्हणून जेव्हा मला हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा मी अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली की प्रेक्षकांना वाटले मी त्यांनाच प्रश्ना केला आहे. यामुळे मी आश्चर्यचकित झालो असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले की, सीन शूट झाल्यानंतर, सलमानचा एक सहाय्यक माझ्याकडे आला आणि म्हणाला की मला त्या सीनमध्ये माझी प्रतिक्रिया बदलावी लागेल. असिस्टंटला वाटले की मी सलमानच्या देवी लाल सिंगसमोर घाबरल्यासारखे वागले पाहिजे. जेव्हा मी असा युक्तीवाद करण्याचा प्रयत्न केला की अशा प्रतिक्रियेला काही अर्थ नाही, तेव्हा त्याच्या सहाय्यकाने निदर्शनास आणून दिले की सलमानलाही प्रतिक्रिया आवडणार नाही. सलमानने त्याच्या असिस्टंटला फोन करून मला अजिबात त्रास देऊ नका असे सांगितले. अशी आठवण सौरभ यांनी सांगितली.- किर्ती कदम
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र