लेख-समिक्षण

व्हॉट्स अ‍ॅप वापरताय?

आतापर्यंत तुम्ही तुमचे फेसबुक, इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याच्या बातम्या वाचल्या असतील. पण आता व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याचे अनेक बातम्या समोर येत आहेत. पत्रकार तसेच नेत्यांचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक होत आहेत. या अ‍ॅपद्वारे घोटाळा आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. जर तुम्हीही चॅटिंग आणि कॉलिंगसाठी आंधळेपणाने व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल, तर काही आवश्यक सेटिंग्ज आणि खबरदारी घेऊन तुम्ही तुमचे अकाउंट सुरक्षित ठेवू शकता.
सुरक्षित व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी तुम्हाला काही सेटींग कराव्या लागतील.
टू स्टेप व्हेरिफिकेशन सुरू करा
तुमचे व्हॉटसअ‍ॅप अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी, टु स्टेप व्हेरिफिकेशन सुरू करा.
यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवरील सेटिंग्ज मेनूमध्ये जावे लागेल. यानंतर, तुम्हाला प्रायव्हसी ऑप्शन निवडावा लागेल. येथे तुम्हाला टू-स्टेप व्हेरिफिकेशनचा पर्याय दिसेल. यावर क्लिक करुन सहा अंकी पीन सेट करावा लागेल.
जर एखाद्या अनोळखी नंबरवरून व्हाट्सअ‍ॅपवर मेसेज आला तर तो मेसेज काळजीपूर्वक उघडा. या मेसेजध्ये अनेकदा संशयास्पद लिंक्स शेअर केल्या जातात. यावर क्लिक करण्यापूर्वी नीट तपासा. या लिंक्समध्ये मालवेअर असू शकते किंवा ते फिशिंग हल्लासाठी असू शकतात. तुमच्या खात्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तुमच्या गोपनीयता सेटिंग्ज नेहमी अपडेट ठेवा. लास्ट सीन ऑनलाईन या सेटींगला माय काँटॅक्टस् किंवा नोवन वर सेट करा.
प्रोफाईल फोटोमध्येही माय काँटॅक्टस् सेट करा, कारण अनोळखी लोकांना तुमचा डीपी दिसणार नाही. स्टेटस अँड अबाऊटलाही हेच सेटिंग करा. जर तुम्हाला अनोळखी नंबरवरुन फोन किंवा मेसेज येत असतील तर ते नंबर ब्लॉक करा. व्हॉटसअ‍ॅपवर ऑटोमॅटिक मीडिया फाइल डाउनलोडिंग बंद करा. असे केल्याने, तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवर येणारे फोटो, व्हिडिओ आणि कागदपत्रे थेट डिव्हाइसमध्ये सेव्ह होणार नाहीत.
ऑटो डाऊनलोड बंद करण्यासाठी पहिल्यांदा सेटिंग्ज मेनूवर जा. यानंतर तुम्हाला स्टोरेज आणि डेटा आणि मीडिया ऑटो-डाउनलोड वर जावे लागेल. येथे जा आणि सेटिंग कधीही नाही वर सेट करा. तसेच तुमचे अकाऊंट कोणत्या डिव्हाईसवर लॉगिन आहे हे चेक करत जा.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …